Jalyukta Shivar Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jalyukta Shivar Abhiyan : ‘जलयुक्त’अंतर्गंत ६१ कोटींवर निधीचा प्रारुप आराखडा

Jalyukta Shivar : जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये माथा ते पायथा उपायोजनाअंतर्गंत १७ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची १ हजार १९५ कामे प्रस्तावित आहेत.

Team Agrowon

Jalyukta Shivar Abhiyan Update : जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये माथा ते पायथा उपायोजनाअंतर्गंत १७ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची १ हजार १९५ कामे प्रस्तावित आहेत.

त्यादृष्टीने आवश्यक अंदाजित ६१ कोटी ३० लाख २५ हजार रुपये निधी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

मोसमी पावसाची अनियमितता,असमान वितरण, खंडकाळ यामुळे कृषी क्षेत्रात अनिश्चितता तसेच पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनाअंतर्गंत तत्कालीन युती सरकारच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांक्षी मोहीम २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत राज्यात राबविण्यात आली.

परभणी जिल्ह्यात २०१५-१६ यावर्षी १७० गावे, २०१६-१७ मध्ये १६० गावे,२०१७-१८ मध्ये १२८ गावे, तर २०१८-१९ मध्ये १२४ गावांची यामध्ये निवड करण्यात आली होती.सध्याच्या राज्य सरकारने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे.

ग्राम जलसंधारण समितीच्या माध्यमातून गावाचा ताळेबंद करण्यात आला. शिवार फेरीव्दारे जलसंधारणाच्या कामांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. गावनिहाय विविध जलसंधारणाच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले.

जिल्ह्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात कृषी विभागामार्फत १३ हजार ९३० हेक्टरवरील ६८९ कामांसाठी १७ कोटी ५० लाख ९८ हजार रुपये तर जलसंधारणविभागा मार्फत ३ हजार ७३१ कामांसाठी ४२ कोटी ५१ लाख ६८ हजार रुपये निधी आवश्यक आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत लघु पाटबंधारे विभागामार्फत २८ कामांसाठी ७७ लाख ५० हजार रुपये, भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ५५ कामांसाठी ३९ लाख ९ हजार रुपये निधी आवश्यक आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० तालुकानिहाय प्रस्तावित कामे,अंदाजित निधी (कोटी रुपये)

तालुका- समाविष्ट गावे- कामांची संख्या- क्षेत्र हेक्टर- निधी

परभणी - १० - ९९ - १०९- ६.१८

जिंतूर - २६ - ५८७- ८६४०- २२.८४

सेलू - ८- २६ - ०० -२.३७

मानवत - २- २८ - २५० - ०.६५

पाथरी - ३- २- ००- ०.३८

सोनपेठ - ६- १९- ००- ०.२७

गंगाखेड - २०- २८० - ६५२२ - १६.८८

पालम - १०- १०६- १९४०- ८.३३

पूर्णा - ६ - ४८- २००- ३.३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT