Akola News : जलयुक्त शिवार अभियान २.० साठी जिल्ह्यात १३१ गावांमध्ये जलसंधारण उपचाराची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, जिल्हास्तरीय समितीने १३१ गावांमधील १६७४ कामांच्या गाव आराखड्यास मान्यता दिली आहे.
याअंतर्गत १३१ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये निधीतून जलसंधारण उपचाराची कामे होणार आहेत. या कामांची अंदाजपत्रके तयार करून तत्काळ प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणेस दिल्या आहेत.
या आराखड्यानुसार अकोला तालुक्यात १७ गावांत १९३ कामे केली जातील. यासाठी १६ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये रक्कम ठेवण्यात आली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात १९ गावांत ३६२ कामे होतील. यासाठी १८ कोटी ६८ लाख ६० हजार रुपये, अकोट तालुक्यातील २२ गावांत ६७ कामे होणार आहेत. यासाठी २५ कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
तेल्हारा तालुक्यातील २५ गावांत २०० कामे आहेत. यासाठी ३३ कोटी ५५ लाख ८० हजार रुपये, मूर्तिजापूर तालुक्यात २७ गावांत ४१६ कामांसाठी १५ कोटी ४२ लाख १९ हजार रुपये खर्च आहे.
बाळापूर तालुक्यात आठ गावांत १३३ कामांसाठी ७ कोटी ४० लाख २७ हजार रुपये आणि पातूर तालुक्यात १३ गावांत ३०३ कामे केली जाणार असून, १३ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. १३१ गावांमध्ये १६७४ कामे प्रस्तावित असून त्याची १३१ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये इतकी आहे.
या सर्व आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली.
यंत्रणानिहाय कामे व खर्च
मृद् व जलसंधारण विभाग- १०५० कामे, ९६ कोटी ४० लाख ७८ हजार
जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उपविभाग- १९५ कामे, २७ कोटी ३५ लाख ३ हजार
उपवनसंरक्षक वन विभाग- ६० कामे, ३ कोटी ५५ लाख ६८ हजार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- ३६६ कामे, ४ कोटी २ लाख ७८ हजार
कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे- ३ कामे, ३६ लाख रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.