Farm Pond Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Scheme : वैयक्तिक शेततळ्यांसाठी हिंगोलीत २७८ अर्ज

वैयक्तिक शेततळे या घटकाचा लाभ घेण्याकरिता महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

Team Agrowon

Hingoli News : मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Agriculture Irrigation Scheme) वैयक्तिक शेततळे (Farm Pond) या घटकासाठी हिंगोली जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षासाठी २८० शेततळ्यांचा लक्ष्यांक आहे. या घटकांच्या लाभासाठी महा-डीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरू आहे.

गुरुवारपर्यंत (ता. २३) जिल्ह्यातील २७८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी विभाच्या (Agricultural Department) सूत्रांनी दिली.

वैयक्तिक शेततळे या घटकाचा लाभ घेण्याकरिता महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी २८० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

दिव्यांग लाभार्थीसाठी जिल्हास्तरावर १४ शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. गुरुवारपर्यंत (ता. २३) २७८ अर्ज आले आहेत. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातून प्राप्त अर्जाची संख्या लक्ष्यांकापेक्षा कमी आहे. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनागव तालुक्यातून लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

यात १५x१५x३ ते ३४x३४x३ मीटर शेततळ्याच्या एकूण आठ आकारमानासाठी रक्कम १४ हजार ४४३ रुपये ते कमाल ७५ हजार रुपये अनुदान देय आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात येत आहे.

महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी केलेले जुने अर्ज रद्द करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या लिंकवर लॉगिन करून अर्ज करणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

या लिंकवर अर्ज करा, या पर्यायावर क्लिक करा

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या लिंकवर लॉगिन करून सिंचन सुविधा व साधने ही बाब निवडा-वैयक्तिक शेततळे ही बाब निवडा, इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय यापैकी एक उपघटक निवडा-परिमाण निवडा (शेततळ्याचा आकार)-स्लोप निवडा-जतन करा-अर्जाचे शुल्क ऑनलाईन अदा करा, याप्रमाणे वैयक्तिक शेततळे अर्ज स्थिती (ता.२३ फेब्रुवारीपर्यंत)...माहिती भरावी, असे जिल्हा अधिकारी शिवराज घोरपडे यांनी सांगितले.

Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT