Farm Pond Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Subsidy : सोलापुरात शेततळ्यासाठी १७ लाखांचे अनुदानवाटप

सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Solapur News : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेतून जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ४० शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले असून, त्यातील ३४ शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

श्री. शिंदे म्हणाले, की पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येत आहे. गत आर्थिक वर्षात जिल्हाभरातून ८ हजार १५६ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले.

त्यातील महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने ९०१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ६५३ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. त्यातील ४० अर्ज अनुदानासाठी मंजूर करण्यात आले असून, ३४ शेतकऱ्यांना १६ लाख ८६ हजार ९९३ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

शेततळ्यासाठी इथे करा अर्ज

शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर CSC केंद्रावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड केली जाते.

तालुकानिहाय वाटप केलेले अनुदान

तालुकानिहाय अनुदान वाटप केलेले शेतकरी आणि कंसात अनुदान रक्कम पुढीलप्रमाणे- बार्शी- एक (५६, ८१८ रुपये), करमाळा - एक (७५ हजार रुपये), माढा- आठ (१ लाख ९६ हजार ७१४ रुपये), माळशिरस - एक (७५ हजार रुपये), मंगळवेढा - सात (३ लाख२ हजार ४०२ रुपये), मोहोळ - दोन (दीड लाख रुपये) पंढरपूर - सहा (२ लाख ९० हजार ८५३ रुपये), सांगोला- ४ (तीन लाख रुपये)दक्षिण सोलापूर- चार (दोन लाख ४० हजार २०६ रुपये).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा

Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय

SCROLL FOR NEXT