Jal Jeevan Mission Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’मध्ये बुलडाण्यातील १,२५६ गावे

शासनाकडून राबवल्या जात असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १,२५६ गावांचा समावेश करण्यात आल्याने यापुढील काळात टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः शासनाकडून राबवल्या जात असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) जिल्ह्यातील १,२५६ गावांचा समावेश करण्यात आल्याने यापुढील काळात टंचाईची (Water Shortage) समस्या दूर होण्यास मदत होईल. समावेश झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर झाली आहेत.

या मिशनअंतर्गत दरदिवशी दरडोई ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १,२५६ गावे समाविष्ट करण्‍यात आली. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ९०८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्र जिवन प्राधिकरणामार्फत ३४८ गावांमध्ये कामे केली जातील.

या गावामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाची ७१५ कामे मंजूर करण्यात आली आहेत. या मिशनअंतर्गत समावेश केलेल्या गावांसाठी मंजूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावकऱ्यांना बारा महिने दर दिवशी दरडोई ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे जलजीवन मिशनअंतर्गत समाविष्ट गावांमध्ये २० कुटुंबे असली तरी त्यांना सोलर ड्युवेल पंप योजनेंतर्गत पूर्णवेळ पाणी मिळणार आहे.

टंचाईग्रस्त गावांना लाभाची गरज

प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात दर वर्षी काही गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. प्रशासनाला टँकरने पुरवठा सुरू करावा लागतो. मुबलक पाऊस होऊनही ही समस्या सुटलेली नाही. आता जलजीवन मिशनमध्ये योजना उभ्या राहणार असल्याने टंचाईग्रस्त गावांना लाभ होईल. यापूर्वी अनेक योजना आल्या. मात्र, पाणीपुरवठ्याची समस्या कधीच सर्वार्थाने सुटलेली नव्हती. किमान या जलजीवनची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर टंचाईचे दिवस संपुष्टात येतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT