Atal Bjujal Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

‘अटल भूजल’ योजनेतून १०० कोटींचा निधी मिळणार

अटल भूजल योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटपाकरिता १०० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत २० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः अटल भूजल योजनेतून (Atal Bhujal Scheme) राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान (Subsidy Distribution To Farmer) वाटपाकरिता १०० कोटी (Fund) रुपये मिळणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत २० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले, की राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये राबविली जात असलेल्या या योजनेसाठी केंद्र शासनाकडून १०० टक्के निधी मिळणार आहे. कृषी विभागाला तीन वर्षांत १०० कोटी रुपये मिळणार असून, त्याचे वाटप ३८ गावांमधील ११४० गावांमध्ये केले जाईल. या योजनेतून मुख्यत्वे सूक्ष्म सिंचनाच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

२०२१-२२ मध्ये प्राप्त झालेल्या २० कोटींच्या निधीतून राज्य शासनाने आतापर्यंत ५१८६ शेतकऱ्यांना सहा कोटी ८३ लाख रुपये अनुदान थेट बॅंक खात्यात जमा केले आहे.

डॉ. मोते म्हणाले, की मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेसाठीदेखील गेल्या हंगामातील २०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून १ लाख ५५ हजार २८५ शेतकऱ्यांना १७९ कोटी ६७ लाख रुपये अनुदान दिले गेले आहे. २०२२-२३ मध्ये २६० कोटींचा निधी या योजनेकरिता मंजूर झाला आहे.त्यातील १४५ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकऱ्यांचे २८ ऑक्टोबरला कर्जमुक्तिसाठी निर्णायक आंदोलन

Bamboo Industry: बांबू क्षेत्रासाठी शिक्षण, कौशल्य निर्मिती करावी

Agriculture Crisis: शेतीमालाला भाव पाडल्याने ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान

Ozone Layer: ओझोन थर होतोय पूर्ववत

SCROLL FOR NEXT