Parbhani News: यंदा खुल्या बाजारात कापसाचे दर कमी आहेत. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी ‘सीसीआय’च्या हमीभाव केंद्रांवर कापूस विक्री करीत आहेत. शुक्रवार (ता. २) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) १४ केंद्रांवर ७ लाख २४ हजार ९९६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून २ लाख ४६ हजार ८१४ क्विंटल खरेदी केला आहे. तर सीसीआय आणि खासगी मिळून या दोन जिल्ह्यांत ९ लाख ७१ हजार ८१० क्विंटल कापूस खरेदी केला आहे..‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाईल अॅपद्वारे दोन जिल्ह्यांतील ८५ हजार ५२० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४६ हजार ८८१ शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांना कापूस विक्रीस घेऊन येण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे..Cotton Price: कापूस भावाला मजबूत आधार.परभणी जिल्ह्यात ८.८४ लाख क्विंटल खरेदीपरभणी जिल्ह्यात ‘सीसीआय’ आणि खासगी मिळून एकूण ८ लाख ८४ हजार ५०७ क्विंटल कापूस खरेदी झाली. ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, ताडकळस या १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत ७२ हजार १६६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४१ हजार ५३९ शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस विक्रीस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली..Cotton Import Duty: कापूस आयातीवर ११ टक्के शुल्क लागू.जिल्ह्यातील ३३ जिनिंग कारखान्यांमध्ये ६ लाख ४२ हजार ६७४ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ७७१० ते ८०६० रुपये दर मिळाले. खासगी व्यापाऱ्यांकडून परभणी जिल्ह्यातील १० कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत २६ जिनिंग कारखान्यांमध्ये प्रति क्विंटल ६७०० ते ७४४० रुपये दराने २ लाख ४१ हजार ८३३ क्विंटल कापूस खरेदी झाली..हिंगोली जिल्ह्यात ८७ हजार क्विंटल खरेदीहिंगोली जिल्ह्यात ‘सीसीआय’ आणि खासगी मिळून एकूण ८७ हजार ३०३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. ‘सीसीआय’च्या केंद्रांवर कापूस विक्रीसाठी हिंगोली, आखाडा बाळापूर, वसमत, जवळा बाजार या ४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गतच्या ‘सीसीआय’च्या केंद्रावर कापूस विक्रीसाठी १३ हजार ३५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ५ हजार ३४२ शेतकऱ्यांची पडताळणी करून केंद्रावर कापूस घेऊन येण्यास मंजुरी देण्यात आली..या बाजार समित्यांतर्गत ५ जिनिंग कारखान्यांमध्ये ८२ हजार ३२२ क्विंटल कापूस खरेदी असून, प्रति क्विंटल ७७१२ ते ८०६० रुपये दर मिळाले. खासगीमध्ये जिल्ह्यातील २ बाजार समित्यांमधील ३ जिनिंग कारखान्यामध्ये ४हजार ९८१ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रति क्विंटल ७२०० ते ७४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.