Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्यासाठी आले १ कोटी ६९ लाख अर्ज

Crop Insurance Application : पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शेवटच्या दिवशी एक कोटी ६९ लाखापर्यंत पोहोचली.

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शेवटच्या दिवशी एक कोटी ६९ लाखापर्यंत पोहोचली. “आता अर्ज नोंदणी बंद करण्यात आली असून प्राप्त अर्जांची छाननी सुरू झाली आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ऑनलाइन विमा अर्ज भरण्यासाठी केंद्राने गुरुवारपर्यंत (ता.३) तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. गेल्या खरिपात विम्यासाठी ९६ लाख ६२ अर्ज आले होते. परंतु यंदा विक्रमी म्हणजेच एक कोटी ६९ लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बहुतेक अर्ज बिगर कर्जदार गटातील शेतकऱ्यांचे आहेत.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, प्राप्त अर्जांमध्ये एक कोटी ६३ लाख शेतकरी बिगर कर्जदार गटातील आहेत. कर्जदार गटातून केवळ पाच लाख ७६ हजार अर्ज आले आहेत. यंदा १४२ लाख हेक्टरच्या पुढे खरिपाच्या पेरण्या होतील. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत प्रचंड सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान ११२ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

पीकविमा कंपन्यांकडे आलेल्या या अर्जांमुळे आतापर्यंत विमा संरक्षित रक्कम ५४ हजार ४३८ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कंपन्यांची यंत्रणा सध्या अर्ज छाननीत व्यस्त आहेत. संशयास्पद माहिती असलेले अर्ज यातून रद्द केले जातील.

“राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विमाहप्त्याची रक्कम यंदा स्वतः भरण्याचा निर्णय घेतला. केवळ एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा नोंदणीची सुविधा दिली. त्यामुळेच विमा योजनेत यंदाचा शेतकरी सहभाग अभूतपूर्व दिसतो आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातून सर्वाधिक सहभाग

पीकविमा योजनेसाठी सर्वाधिक ऑनलाइन अर्ज बीड जिल्ह्यातून आलेले आहेत. काही निवडक जिल्ह्यांमधून आलेल्या अर्जांची संख्या अशी (सर्व आकडे लाखांत) ः बीड १८.४८, नाशिक ५.८७, जळगाव ४.५२, नगर ११.७२, पुणे २.२३, सोलापूर ६.७६, जालना १०.१५, लातूर ८.६२, धाराशिव ७.५७, नांदेड ११.९७, परभणी ७.६१, हिंगोली ५.१२, बुलडाणा ७.३०, अकोला ४.३३, वाशीम ४.२५, यवतमाळ ८.४२, नागपूर २.०५

सात हजार ९०० कोटींवर उलाढाल

पीकविमा अर्जासोबत शेतकऱ्यांनी एक रुपया विमा शुल्कातून विमा कंपन्यांकडे एकूण एक कोटी ६९ लाख रुपयांच्या आसपास रक्कम जमा केली आहे. याशिवाय विमा हप्ता अनुदानापोटी चार हजार ७५५ कोटी रुपये राज्य शासनाकडून विमा कंपन्यांना मिळतील. तसेच केंद्राकडून तीन हजार २१६ कोटी रुपये दिले जातील. एकूण सात हजार ९०० कोटींची उलाढाल पीकविमा व्यवसायात होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध

Farmer Property Rights: महसुली न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

Karnataka Sugarcane Price: कर्नाटकातील ऊसदरावर निघाला तोडगा, टनामागे ३,३०० रुपये दर जाहीर, शेतकरी आंदोलनाचा शेवट गोड

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Infectious Disease: ‘ताप’ संसर्गजन्य रोगाचा!

SCROLL FOR NEXT