Ramnath Kovind Agrowon
मुख्य बातम्या

जलसमृद्ध सरपंचांनी स्वतः पुढाकार घ्यावा : राष्ट्रपती कोविंद

संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलशक्ती अभियान यशस्वी केले पाहिजे.

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली : ‘‘कोरोना लसीकरणाचे आव्हान आपण उत्तमपणे पेलले. त्याचप्रमाणे आता संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलशक्ती अभियान यशस्वी केले पाहिजे. देशभरातील सरपंच आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (ता. २९) येथे केले.

नवी दिल्ली : ‘‘कोरोना लसीकरणाचे आव्हान आपण उत्तमपणे पेलले. त्याचप्रमाणे आता संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलशक्ती अभियान यशस्वी केले पाहिजे. देशभरातील सरपंच आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन राष्ट्रपती (President)रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी मंगळवारी (ता. २९) येथे केले.
तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कोविंद बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राजधानीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती(President), तसेच केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते जलक्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी राज्ये, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना ११ श्रेणींमध्ये ५७ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माध्यम(Media) क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सकाळ ॲग्रोवन’ला(Sakal - Agrowon) द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘सकाळ-ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात सोलापूर जिल्ह्यातील सुरडी ग्रामपंचायतीला तिसरा, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था गटात दापोली नगरपंचायतीला दुसरा, तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था ग्रामविकास संस्था (औरंगाबाद) यांना विभागून तिसरा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील(Maharashtra) या संस्थांच्या प्रतिनिधींना पुरस्कार स्वीकारले.

सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशला(UP) प्रथम, राजस्थानला द्वितीय आणि तमिळनाडूला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. कोविंद म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीत नद्यांना खूप महत्त्व आहे. नदीला आपण माता मानतो. उद्योगप्रधान अर्थव्यवस्था(Economy) स्वीकारल्यानंतर मात्र निसर्गावर अन्याय सुरू झाला. जलसाठ्यांवर ताण आला. हवामान बदलाने कमालीचे तीव्र बदल आपल्याला सहन करावे लागत आहेत. कोठे अवर्षण तर कोठे महापूर असे चित्र तयार झाले आहे. शेतकऱ्यांसह(Farmers) सर्वच घटक त्यामुळे अडचणीत आले आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजनांबरोबरच जलशक्ती अभियान गेली तीन वर्षे राबवीत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. जलसमृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.’’

या वेळी जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, ‘‘सन २०५० पर्यंत जलसंकट गडद होणार आहे. जलसंधारण करून पाणी अडवणे, त्याचा योग्य वापर करणे, त्याचा पुनर्वापर करणे अशी त्रिसूत्री घेऊन काम करावे लागेल. केंद्र सरकार त्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. पडणारा पाऊस(Rain) अडवण्यासाठी जलशक्ती अभियान राबवले जात आहे. यंदा त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.’

‘ॲग्रोवन’ची ‘जल’जागृती
गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून जलसंधारण, जल व्यवस्थापन, कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन, जलसाक्षरता यांसह पाणी वापर संस्थांची आदर्श कार्यपद्धती, पाणीविषयक शासनाच्या विविध योजना, धोरणे यांना प्रसिद्धी देण्यासह हजारो यशकथा प्रकाशित केल्या आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त २० एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पाणी परिषद घेऊन ‘दुष्काळ(
Drought) मुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेवर काम सुरू केले गेले. तसेच २०१९ मध्ये ‘जल व्यवस्थापन वर्ष’ साजरे करून पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासह पाणी बचतीचा राज्यभरात जागर करण्यात आला. शिवाय सरपंच महापरिषदा, विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून पाणी बचत आणि व्यवस्थापनाचा मंत्र शेकडो गावच्या पुढाऱ्यांना, शेतकऱ्यांना(Farmer) देण्यात आला. या कामाची दखल जल पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT