Food Processing Industry  Agrowon
मुख्य बातम्या

Agro-Processing Clusters : राजस्थानमध्ये कृषी-प्रक्रिया क्लस्टर्स करण्यासाठी व्यापार संघटनांची पंतप्रधानांकडे मागणी

New agro processing clusters : राजस्थानमध्ये 50 नवीन कृषी-प्रक्रिया क्लस्टर्सच्या स्थापन करावी. त्यामुळे राजस्थानमध्ये आर्थिक विकास, कृषी उत्पादकता वाढवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मदत होईल.

Team Agrowon

Food Processing Clusters : राजस्थानमध्ये 50 नवीन कृषी-प्रक्रिया क्लस्टर्स स्थापन करण्यात यावे, अशी मागणी अखिल राज्य व्यापार आणि उद्योग संघटना (राजस्थान), राजस्थान स्थित व्यापारी संस्था, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजस्थानच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजे २५ टक्के वाटा असलेल्या कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर असोसिएशनने भर दिला आहे.

असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रेम बियाणी यांनी असा विश्वास व्यक्त केला की, या अन्न प्रक्रिया क्लस्टर्सच्या स्थापनेमुळे चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनांची निर्यात होईल. तसेच स्थानिक बाजारपेठेची मागणी पूर्ण होईल.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळून फायदा होईल. त्याचबरोबर या युनिट्समध्ये कृषी आधारित उत्पादनांची साखळी तयार केल्यास सरकारवरील बोजा देखील कमी होईल, असे बियाणी म्हणाले.

राजस्थानने आधीच कृषी-प्रक्रिया, कृषी-व्यवसाय आणि कृषी-निर्यात प्रोत्साहन धोरण लागू केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून कृषी-प्रक्रिया युनिट्स आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्याज अनुदानासह प्रोत्साहन आणि सवलती देण्यात येतात.

शेतीमधील विविध पिकांच्या उत्पादनात राजस्थानचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. देशाच्या एकूण बाजरी उत्पादनापैकी ४२ टक्के, मोहरीचे ४५ टक्के, तेलबियांचे २२ टक्के, तीळाचे १७ टक्के, भुईमूगाचे १९ टक्के, चनाचे २० टक्के, ज्वारीचे १३ टक्के आणि गवारचे ८५ टक्के उत्पादन राज्यात होते.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात राजस्थानने प्रमुख क्षेत्रांमध्ये विक्रमी उत्पादन घेतले आहे. राज्यात ९ लाख ५६ हजार टन फळे, २३ लाख टन भाजीपाला, १० लाख टन मसाले, 10 लाख टन तेलबिया, २५४ लाख टन अन्नधान्य आणि कडधान्ये उत्पादन होते. हे आकडे राजस्थानमध्ये कृषी-प्रक्रिया क्लस्टर्स स्थापन करण्याची आवश्यकता अधोरेखित करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

SCROLL FOR NEXT