मुख्य बातम्या

Seeds And Fertilizers : बियाणे, खतांचा तुटवडा नाही

जिल्ह्यासाठी रब्बीसाठी १ लाख १५ हजार टन खतांचे नियोजन

टीम ॲग्रोवन

अमरावती : यावर्षीच्या रब्बी हंगामाची (Rabi Season) पूर्वतयारी सुरू झाली असून, कृषी विभागाने खते व बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख १५ हजार टन खते व १ लाख २३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. अतिवृष्टीमुळे (Wet Drought) खरिपातील पिकांची हानी झाली असली तरी रब्बी हंगामाकडून भरपूर अपेक्षा आहेत.

यावर्षी बियाणे व खतांचा तुटवडा जाणार नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे. गत हंगामात डीएपीच्या तुटवड्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात २ लाख १,१६९ हेक्टर जमीन पेरणीखाली येणार आहे. या हंगामात रब्बी ज्वारीसह गहू, हरभरा, करडई व मका या पिकांची पेरणी जिल्ह्यात केली जाते.

जिल्ह्यात १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी अपेक्षित करण्यात आली आहे. त्या खालोखाल गव्हाखाली ५५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. ५५० हेक्टरमध्ये रब्बी ज्वारी, ५१ हेक्टरमध्ये करडई व मक्याखाली ५ हजार हेक्टर क्षेत्र येणार असल्याचे अपेक्षित आहे. यावर्षी हरभरा या पिकाच्या बियाण्यांत ५० व गव्हाच्या बियाण्यांत ७० टक्के बदलाचे प्रमाण राहणार आहे.

कृषी विभागाने २ लाख १ हजार १६१ हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख २३ हजार ३७९ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून सार्वजनिक क्षेत्रातून ३६ हजार ५२२, खासगी क्षेत्रातून ५५ हजार ३४२ तर ३१ हजार ५१५ क्विंटल बियाण्यांच्या पुरवठ्याची मागणी महाबीजकडे केली आहे. महाबीजकडे गव्हासाठी १३ हजार क्विंटल तर, हरभऱ्याचे १५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा महाबीजकडून अपेक्षित करण्यात आला आहे.

१ लाख १२५ हजार टन खताची गरज

जिल्ह्यात रब्बीखाली येणाऱ्या पिकांसाठी १ लाख १५ हजार ६५२ टन खतांची गरज भासणार असल्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत खतांचे वाटप होणार असून तुटवडा जाणार नसल्याचाही दावा केला आहे.

हंगामात युरिया ३७,८४४, डीएपी २०,३५०, एमओपी १४,८५३, कॉम्प्लेक्स १९,१४०, एसएसपी २१,६६५ व इतर खतांचा १८०० क्विंटल पुरवठा करण्यात येणार आहे. डीएपीच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT