Ujani Dam Agrowon
मुख्य बातम्या

Ujani Dam : उजनीतील पाणी तूर्त पिण्यासाठी राखीव

Maharashtra Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आता सोलापूर उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Team Agrowon

Solapur News : पावसाळा सुरू होऊन दीड महिना होतोय, तरीही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनीची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आता उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच पावसाचा अंदाज घेऊन बॅक वॉटरवरील शेतीपंपाचा पाणीपुरवठा आगामी काळात बंद होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मागच्या वर्षी या दिवसात पुण्यासह धरण क्षेत्रातील पावसाचे पाणी धरणात जमा होत होते. पण यंदा खूपच भयावह परिस्थिती आहे. पेरण्या खोळंबल्या असून, उजनीत सध्या अडीच हजाराचा विसर्ग येत आहे. तो विसर्ग दौंडचा नसून, स्थानिक परिसरातील पावसाचे पाणी आहे. खडकवासला धरण अजूनही ४८ टक्क्यांवरच थांबले असल्याने दौंडवरून धरणात काहीच विसर्ग येत नाही. दरम्यान, उजनी धरणाच्या बॅक वॉटरवरील शेतीला दरमहा साधारणतः एक टीएमसी पाणी घेतले जाते. बॅक वॉटरवर ३४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. सध्या धाराशिव, नगर, इंदापूर, सोलापूरसह काही ‘एमआयडीसीं’चा पाणीपुरवठा सुरू आहे. पण आणखी १५-२० दिवस पाऊस न झाल्यास धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उजनीत उणे ३५.३ टक्के पाणी

बुधवारी (ता. १२) दुपारी एकच्या आकडेवारीनुसार उजनीकडे दौंडकडून १५८८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. तर उजनी धरणामध्ये एकूण पाणी पातळी ४८७.९२५ मीटरपर्यंत आहे. एकूण पाणीसाठा ४४.८९ टीएमसी आहे, तर त्यापैकी उपयुक्त साठा उणे १८.७७ टीएमसी आहे. तर या पाण्याची टक्केवारी उणे ३५.३ टक्के इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT