Ujani Dam : ‘उजनी’च्या पाणीसाठ्यात अर्धा टीएमसीने वाढ

Solapur News : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. वरच्या धरणांकडून पाण्याचा विसर्ग सध्या सुरु झाला आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on: 
Updated on: 

अॅग्रोवन वृत्तसेवा
Catchment Area of Ujani Dam : सोलापूर ः उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. वरच्या धरणांकडून पाण्याचा विसर्ग सध्या सुरु झाला आहे.

तसेच धरण परिसरातही पाऊस होत असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत उजनीमध्ये अर्धा टीएमसी पाणी वाढल्याचे सांगण्यात
आले.

सध्या उजनी धरणात एकूण पाणीसाठा ४४.४५ टीएमसी आहे. त्यात धरण उणे ३६ टक्क्यांवर पोचले आहे. थांबलेल्या मॅान्सूनमुळे चिंता वाढली असताना गेल्या दोन दिवसांत पावसाने पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या दौंडकडून धरणाकडे आठ हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत धरण परिसरातही हलका पण चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे.

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’च्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ; विसर्ग सुरू

मंगळवारी (ता.४) दुपारी धरणात ४४.४५ टीएमसी इतका पाणीसाठा राहिला. तर त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १९.२१ टीएमसी तर पाण्याची टक्केवारी उणे ३५.८५ टक्के इतकी राहिली.

पाऊस असा अखंडपणे आणि सातत्याने राहिल्यास लवकरच धरण उणे पातळीतून अधिक पातळीत येईल, असे
सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com