Pre Kharif Meeting agrowon
मुख्य बातम्या

Kharif Season : शेतकऱ्यांनो... इतक्यात पेरणीची घाई नको ; खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत आवाहन

Pre Kharif Season Review Meeting : यंदा राज्यात मॉन्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लवकर पेरणी करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आला आहे.

Team Agrowon

Kharif Review Meeting : यंदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व (Pre monsoon rain) पावसाने हजेरी लावली आहे. त्याच पावसावर अनेक ठिकाणी शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करतात.

यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मॉन्सूनचा पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक २०२३ पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, सुरेश खाडे, गुलाबराव पाटील, अतुल सावे, कृषी सचिव, कृषी आयुक्त विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

हवामान खात्याने मॉन्सूनचा पाऊस उशिरा येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी पेरणीची घाई धोकादायक ठरू शकते. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई न करता सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी. शक्यतो ८० ते १०० मिली मीटर पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, त्या आधी पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीच संकट ओढवण्याची शक्यता आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Unseasonal Rain: विदर्भ, मराठवाडा, कोकणला अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान

Donald Trump Tarif: उधळलेल्या बैलाच्या नाकात वेसण

Maize Farming: दिशा मक्याच्या किफायती शेतीची!

Pune Market Theft: पुणे बाजारात चोरांचा सुळसुळाट

Farm Loan Waiver: कर्जमाफी न दिल्यास एक जुलैपासून ‘रेल्वे रोको’

SCROLL FOR NEXT