मुख्य बातम्या

ST Bus : आजपासून शिवशाहीच्या गाड्या बंद, 'त्या' मार्गांवर आता महामंडळाच्या गाड्या

MSRTC Shivshahi Bus : एसटी महामंडळाच्या सेवातून शिवशाही गाड्या आज बंद झाल्या. त्या मार्गावर आता महामंडळाच्या साध्या गाड्या धावणार आहेत.

Team Agrowon

ST AC Bus : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसत राज्यातील मुख्य मार्गांवर एससी बस सेवा सुरु केली होती. यासाठी खासगी कंपन्यांशी करार शिवशाही नावाने बस गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. पण आता (३० जून) ही सेवा बंद झाली आहे. त्या मार्गावर आता एसटीची लाल परी धावणार आहे.

लांब पल्ल्याच्या (Long Route) मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही एसी बसची सेवा सुरु केली होती. त्यासाठी सन २०१८ मध्ये खासगी कंपनींकडून करण्यात आले. शिवशाही गाड्यांना एसटीकडून प्रतिकिमी २९ रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. गाडीची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती.

सुरुवातील या उपक्रमाला अल्पसा प्रतिसाद होता. पण त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आले. तीन वर्षांनंतर २०२१ मध्ये त्या कंपन्यांना मुदत वाढ देण्यात आली. मागील सहा वर्षांपासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू होती.

महामंडळाच्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या २१६ बस होत्या. त्यात काही आरामदायी स्लीपर एसी बसही होत्या. विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर आदी मार्गांवर शिवशाही सेवा देत होती.

या कंपन्याचा महामंडळासोबत असलेला करार ३० जूनच्या रात्री संपला. गेल्या महिनाभरात कंपनीने १०० गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर आता ३० जूनच्या रात्री शिवशाहीची पूर्णत: सेवा बंद केली आहे. त्यामुळे शिवशाहीचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एसटीकडे रुजू झाले. तसेच ज्या मार्गावर शिवशाही बस धावत्या होत्या. त्या मार्गावर महामंडळाच्या गाड्या धावणार आहेत.

काही महिन्यांपासून शिवशाही सेवा बंद झाल्यानंतर तिची उणीव भरून काढण्यासाठी महामंडळाने शिवाई बसची खरेदी केली आहे. या बस इलेक्ट्रिक असून त्या संपूर्ण वातानुकूलित आहेत. मोठ्या शहरातील आगारामध्ये काही शिवाई गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यांची नियमित सेवा सुरू करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Market Committee Privatization: बाजार समित्या अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा डाव; नहाटा यांचा गंभीर आरोप

Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Low Cost Feed Management: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

Quality Seeds Selection: वाण निवडीत दाखवा खरे शहाणपण

External Parasites Control: जनावरातील बाह्य परजीवींचे नियंत्रण

SCROLL FOR NEXT