Team Agrowon
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. तसंच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला.
मुंबई– ठाणे- पुणे या मार्गावर इलेक्ट्रिकवरील १०० शिवनेरी बसेस धावणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृतमहोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं आहे.
एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रदूषणाचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केल्याबद्दल एसटीचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.