Shetkari Kamgar Kaksh Andolan : 'दुधाचे दर पाडणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय' अशा घोषणा देत सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचे डाॅ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज रस्त्यावर उतरत दूध दरासाठी आंदोलन केले. यावेळी पंचायत समिती चौकात रास्ता रोको करण्यात आला.
दुधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट झाली असतानाही दूध डेअरीकडून दुधाच्या दरामध्ये ५ ते ६ रुपयांनी घट झाली आहे. दुसरीकडे पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे दुध उत्पादनाचा खर्च वाढत असून उत्पन्नात घट झाल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
त्यामुळे दुध दरामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी शेकपाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या दुध दराबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेवून त्वरित हा विषय मार्गी लावावा अशी मागणी केली. यावेळी सांगोल्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर तहसीलदार संजय खडतरे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर १०-१५रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे, अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला अनुदान मिळाले पाहिजे.
तसेच निसर्गाच्या अवकृपा व सरकारची अपुरी मदत यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दुध व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले पण अचानक राज्यसरकाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर कमी झाल्याने राज्यसरकारने दुधाचे दर वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी व दुध दरवाढ करावी इत्यादी मागणी करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.