पुणे : फॅट व एस.एन.एफ. मोजणाऱ्या मिल्कोमिटरमध्ये आणि दूध वजन (Milk Weight) काट्यात फेरफार करून दूध उत्पादकांची (Milk Producer) राज्यभर लूटमार सुरू आहे. मिल्कोमिटर यंत्रांच्या प्रमाणीकरणाची कोणतीही शासकीय यंत्रणा राज्यात कार्यरत नाही.
दूध संकलन (Milk collection) केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नाही. त्यामुळे चुकीची मापे दाखवूनही शेतकऱ्यांना लुटले (Milk Rate) जात आहे.
मिल्कोमिटर व वजन काटे नियमित तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी दुग्ध विकास विभागामार्फत (Department of Dairy Development) स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने (Milk Producer Farmers Sangharsh Committee) केली आहे.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याबाबत दुग्ध विकास विभागाला वारंवार निवेदने समितीने दिले आहेत. तसेच दुग्ध विकास मंत्री व दुध आयुक्त यांनाही निवेदने देऊन या प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
मात्र राज्याचा दुग्ध विकास विभाग संपूर्णपणे निष्क्रीय असल्याने याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही, असा दावाही प्रसिद्धी पत्रकात समितीने केला आहे.
दुधाचे दर, फॅट व एस.एन.एफ.नुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मध्ये थोडा जरी बदल झाला तरी दूध उत्पादकाला मोठा तोटा (Milk producer losses) होतो. वजन मापनातील फरकामुळेही शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते.
सुस्त दुग्ध विकास विभाग या लुटमारी विरोधात काहीच करणार नसेल तर शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल, असे मतही समितीने व्यक्त केले आहे.
दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे (Dairy Development Minister Radhakrishna Vikhe) पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालावे. तसेच राज्यात तातडीने दुग्ध विकास विभागाची स्वतंत्र मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लुट थांबवावी.
दरम्यान, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.