Sharad Pawar Agrowon
मुख्य बातम्या

Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार महाराष्ट्रभर फिरणार; असा असणार दौरा?

Ajit Pawar Claims NCP : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी बंडखोरीनंतर पक्ष बांधणीसाठी शरद पवार महाराष्ट्रात झंझावती दौरा करणार आहेत. नेमका त्यांचा दौरा कसा असणार, याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली.

Team Agrowon

NCP Political Crisis : राष्ट्रवादीतील आमदार-खासदारांनी बंड केल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आमच्यासोबत पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पुन्हा एका पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार राज्यभरात झंझावती दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच्या इतर आठ जणांनाही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर अजित पवार आणि भाजप विरोधात शरद पवार मैदानात उतरले आहे. त्याची सुरुवात सोमवारीपासून करण्यात आली. काल त्यांनी कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नव्याने कामाला सुरुवात केली. या दौऱ्यामध्ये त्यांचे ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

शरद पवार यांनी आज सकाळी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली. जयंत पाटील म्हणाले, साताऱ्याच्या दौऱ्यात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी २-३ दिवसांमध्ये दिल्लीत कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यानंतर नाशिक, बीड, अहमदनगर, पुणे सोलापूर आणि काही जिल्ह्यात दौरा सुरुवात केली. नाशिकपासून सुरुवात होणाऱ्या दौऱ्यात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT