Sharad Pawar Agrowon
मुख्य बातम्या

Sharad Pawar : प्रितीसंगमावरून शरद पवारांनी फुंकले रणशिंगे !, म्हणाले, पुन्हा एकदा...

Sharad Pawar Karad Daura : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथील प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून नव्या लढाईचे रणशिंग फुंकले. त्यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Team Agrowon

NCP crisis : अजित पवार यांनी रविवारी दुपारी सर्वांनाच धक्का देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तसेच त्यांच्यासोबत आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले होते.

पवार कराड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, `` देशामध्ये अनेक ठिकाणी लोकशाही मार्गाने आलेली सरकारे उलथून लावण्याचे काम सुरू आहे. एक वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केली. महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवाने त्यांना यात यश आलं. आमचे काही लोक त्याला बळी पडले. महाराष्ट्राची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही याची मला खात्री आहे ``

सहा महिने-वर्षभराच्या कालावधीतच निवडणुका होत आहेत. त्यामध्ये या उलथापालथ करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देऊ असे पवार म्हणाले. उलथापालथ करणाऱ्या शक्ती बाजूला करु आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर नेऊ असे ते म्हणाले.

शरद पवार आज सकाळी पुण्याहून कराडच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर रस्त्यामध्ये कार्यकर्त्यांनी ताफा थांबवून त्यांचे स्वागत केले. कराडमधील प्रितीसंगमावर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, अरुण लाड, आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT