Russia-Ukraine war raises global food inflation 
मुख्य बातम्या

रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतीक अन्नधान्य महागाईची शक्यता

अमेरिकेसह पूर्वेतील देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र यामुळे कच्च्या मालासाठी रशियावर अवलंबून असलेल्या उद्योगाला याचा मोठा फटका बसू शकतो. कोरोनातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी हा धक्का असेल. अनेक देशांना आधीच महागाईच्या झळा बसत आहेत. या देशांमध्ये आणखी महागाई वाढू शकते.

टीम अॅग्रोवन

पुणेः रशिया आणि युक्रेनमधून जगाला गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठा होतो. युध्दामुळे आधीच शेतीमालासह अनेक वस्तुंचे दर वाढले. युध्द आणखी काही दिवस चालल्यास जगात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनचा गहू आणि मक्यासह अन्नधान्य पुरवठ्यात मोठा वाटा आहे. अमेरिका कृषी विभागाच्या(USDA) मते, २०२०-२१ मध्ये या दोन्ही देशांनी ५६० लाख टन गहू निर्यात केली. जागतीक निर्यातीत या देशांचा वाटा २७.६ टक्के होता. तर गहू निर्यातीत(Wheat exports) १५.४ टक्के हिस्सा आहे. रशिया आणि युक्रेनमधून २७९ लाख टन मक्याची निर्यात झाली होती. त्यामुळे या देशांतून धान्य पुरवठा(Grain supply) विस्कळीत होण्याची शक्यता आहे. परिणामी अन्नधान्याच्या दरात वाढ होईल. अमेरिकेसह पूर्वेतील देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र यामुळे कच्च्या मालासाठी रशियावर अवलंबून असलेल्या उद्योगाला याचा मोठा फटका बसू शकतो. कोरोनातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी हा धक्का असेल. अनेक देशांना आधीच महागाईच्या झळा बसत आहेत. या देशांमध्ये आणखी महागाई वाढू शकते. युरोपातील अनेक देश गॅससाठी रशियावर अवलंबून आहेत. या देशांना पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा होतो. मात्र निर्बंध वाढल्यास या देशांना गॅस पुरवठा अशक्य होईल. तसेच रशियातून कच्चे तेल निर्यातही प्रभावित झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. परिणामी कृषी आधारित उद्योगांचाही उत्पादन खर्च वाढतोय. कोरोनामुळे आधीच जागतीक वाहतूक अडथळ्यांनी घेरली आहे. या युध्दामुळे वाहतुकीतील अडचणी आणखीनच वाढल्या. या दोन्ही देशांतील जल आणि रेल्वे वाहतूक सध्या विस्कळीत झाली. यामुळे अनेक शिपिंग कंपन्या काळा समुद्र प्रदेशात माल वाहतुकीला नकार देत आहेत. विमा कंपन्याही या भागासाठी जास्त प्रिमियम आकारत आहेत. कोरनामुळे माल वाहतूक खर्च दुप्पट झाला. आता तेलाचे दर वाढल्याने हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे हि पहा :  जगातील काही देश धान्यासाठी रशिया आणि युक्रनवर थेट अवलंबून आहेत. टर्की आणि इजिप्तला ७० टक्के गहू पुरवठा या देशांतून होतो. तसेच चीनला मका पुरवणार सर्वांत मोठा देश म्हणजे युक्रेन. तसेच खत निर्मितीच्या कच्च्या मालाचा रशिया पुरवठादार आहे. याचा अनेक देशांवर परिणाम होऊ शकतो. रशिया आणि युक्रनेचा निम्मा मका आणि गहू आफ्रिका तसेच मध्य आशियायी देशांत जातो. त्यामुळे या देशांतून धान्य पुरवठा विस्कळीत झाल्यास अन्नसुरक्षेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो.

सूर्यफूल तेलाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जागतीक बाजारात एकटा युक्रेन निम्मे सूर्यफूल तेल पुरवतो. युध्दामुळे येथील उत्पादन आणि प्रक्रिया ठप्प होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सूर्यफूल तेलाचे दर गगणाला भीडतील. याचा सर्वाधीक फटका भारताला बसेल. भारताकडे आयातीसाठी पर्यायही नसतील. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीची झळ बसू शकते. भारतात ८० टक्के सूर्यफूल तेल युक्रेनधून येते. देशाच्या तेल बास्केटमध्ये सूर्यफूलाचा वाटा १५ टक्के आहे. ही स्थिती १० दिवसांत निवळली तर जास्त फरक पडणारन नाही. देशात ४५ दिवस पुरेल एवढा साठा आहे. परंतु युध्द आणखी ५ ते १० दिवस चालले तर कारखाने आधीच बंद आहेत आणि व्हेसल्सही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत देशात एप्रिल महिन्यात काही टंचाई जाणवू शकते.  

भारतात या वस्तू महागतील

भारतात खनिज इंधन आणि तेल, मोती, मौल्यवान खडे, खते, मशिनरी आणि न्यूक्लीअर रिअॅक्टरची रशियातून ५० टक्के आयात होते. युध्दामुळे भारताने या वस्तू इतर देशांतून आयात केल्यास किमतीत ४ ते ६ टक्के वाढ होऊ शकते. युक्रेनमधून सूर्यफुलासह शेतीमाल, वनस्पती तेल, मेटलर्जिकल उत्पादने, प्लास्टीक आणि पाॅलिमर्सची आयात होते. या वस्तुंचेही दर वाढण्याचा अंदाज आहे. तसेच इंधनाचे दर वाढल्यास भारताला मोठा फटका बसेल. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या दरात १० डाॅलरची वाढ झाल्यास महागाई ०.५ टक्क्याने वाढते. असे झाल्यास भाजीपाला, फळे, डाळी, खाद्यतेल आदीचे भाव वाढतील. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT