Ravikant Tupkar
Ravikant Tupkar 
मुख्य बातम्या

तर महावितरणची कार्यालये उद्धवस्त करू; तुपकरांचा इशारा

टीम ॲग्रोवन

बुलडाणा - शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी गेल्या अकरा  दिवसांपासून स्वाभिमानीचे अध्यत्र राजू शेट्टी (Raju Shetti) कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर (MSEDCL Office) बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी (ता.४) राज्यभरात स्वाभिमानीकडून रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे. शेट्टींच्या आंदोलनाची (Shetti Agitation) दखल न घेतल्याने स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) चांगलेच आक्रमक झाले आहेत.

तुपकरांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर-सोलापूर महामार्ग (Nagpur Solapur Highway) चिखलीजवळ पेठ फाट्यावर शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. जोपर्यंत शेट्टीच्या आंदोलनावर मार्ग निघत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका तूपकरांनी घेतली आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

शेतीला रात्री पाणी देताना जंगली जनावरे, साप, विंचू यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. यासाठी शेतीला दिवसा वीज देण्याची स्वाभिमानीची मागणी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास राज्यभरातील महावितरणची कार्यालये उध्वस्त करू, असा गंभीर इशाराही तूपकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना आंदोलनाचा त्रास होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आंदोलकांकडून मुभा दिली जात आहे. एकंदरीतच तुपकरांच्या आक्रमक भुमिकेमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT