Potato Production
Potato Production 
मुख्य बातम्या

बटाटा भाव खाणार?; बंगालमध्ये उत्पादनात २० टक्के घटीचा अंदाज

टीम ॲग्रोवन

यावर्षी पश्चिम बंगालमध्ये उत्पादनात (West Bengol Potato Production) अपेक्षित घट झाल्यामुळे बटाट्याचे दर (Potato Price) गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बटाटा उत्पादक राज्य आहे. अवकाळी पावसामुळे बटाटा लागवडीला (Potato Cultivation) उशीर झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला असून बिझनेसलाईनने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

हेही वाचा - अतिरिक्त चना खरेदीची गुजरातची केंद्र सरकारकडे विनंती यावर्षी पश्चिम बंगालमध्ये बटाटा उत्पादन (Potato Production) २० टक्क्यांनी घटून ८५ ते ९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे लागवडीला झालेला उशीर याला कारणीभूत आहे. गेल्यावर्षी राज्यात बटाट्याचे बंपर उत्पादन (Bumper Potato Production) झाले होते. २०२० मधील ९५ लाख टनांच्या तुलनेत उत्पादन १६ टक्क्यांनी वाढून ११० लाख टन झाले होते.

हेही वाचा - राज्यात खाद्यतेल, तेलबियांवर साठा मर्यादा बटाट्याच्या पोकराज (Pokraj Potato verity) व्हरायटीच्या घाऊक बाजारातील (Potato Wholsale Rate) दर १४० टक्क्यांनी वाढून १२०० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधितील दर हे ५०० ते ५५० रुपये प्रति क्विंटल होते, असे पश्चिम बंगाल कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष तुषार कांती घोष (Tushar Kanti Ghosh) यांनी म्हटले आहे. तर बंगालमधील उत्पादनाचा परिणाम देशातील बटाट्याच्या किमतींवर दिसून येईल, असे फेडरेशन ऑफ कोल्ड स्टोरेज असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आशिष गुरू (Ashish Guru) यांनी सांगितले आहे.   बटाट्याच्या सर्वात मोठ्या बाजारापैकी एक असलेल्या आग्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agra APMC) सध्या बटाट्याचे दर ७८० ते ८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीती बाजारसमितीमध्ये हे दर २०० रुपयांनी कमी होते. १ जानेवारीपासून २३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर प्रदेशात ५९ हजार ३९६ टनांची आवक झाली आहे. गेल्यावर्षी या कालावधीत  ७७ हजार ४२१ टन आवक झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कोल्ड स्टोरेजचे लोडींगचे दर ६० टक्क्यांनी वाढून १५-१६ रुपये प्रति किलो झाले आहे. गेल्यावर्षी लोडींगचे दर ८-१० रुपये प्रति किलो इतके होते.   नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरूवातीला पश्चिम बंगालमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा पिकावर परिणाम झाला. हुगळी, मिदनापूर, बांकुरा आणि बर्दवान या प्रमुख बटाटा उत्पादक जिल्ह्यांमध्ये जवळपास ५५-६- टक्के पेरणी पूर्ण झाली होती. ज्यावेळी जव्वाद वादळाचा तडाखा बसला होता. पावसामुळे शेतात पाणी साचलेल्या पाण्यामुळे केवळ उत्पादनावरच नाही, तर नवीन पिकाच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT