संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

 पुणे जिल्हा परिषदेची उद्या अंदाजपत्रकीय सभा

टीम अॅग्रोवन

पुणे   : जिल्हा परिषदेची तहकूब झालेली अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. या सभेत २०२०-२१ चे अंदाजपत्रक अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे. या सभेत रस्ते, आरोग्य, पाणी टंचाई आराखडा या विषयांवर चर्चा होणार आहे. सभेची लिंक सर्व सदस्यांना पाठविण्यात आली असून त्यासंदर्भात सूचनाही मागविण्यात आल्या, असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात होणारी अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार अंदाजपत्रक मंजुरीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २०१९-२० च्या सुधारित अंतिम अंदाजपत्रक तसेच २०२०-२१ च्या मुळ अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. या अंदाजपत्रकाला सदस्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत अवलोकन आवश्‍यक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आता प्रशासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे ठरवले आहे. अनेक विषय महत्वाचे असल्याने ही तहकूब सभा लवकर करणे गरजेचे होते. वास्तविक पाहता ही सभा जुनपर्यंत घेता आली असती. मात्र, विषय मंजुरीला वेळ झाला असता. यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली असती. त्यामुळे ही सभा लवकर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय, उन्हाच्या झळा वाढताच पाण्याची टंचाई वाढू लागल्याने टंचाई निवारण उपायोजनांसाठी महत्वाचे निर्णय सभेत घेतले जाणार आहे. सदस्यांच्या सुचनांनुसार संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात येणार असून, सभेपूर्वी ती सदस्यांना दिली जाणार आहे. विषय समित्याच्या रिक्त पदांची निवड या सभेत करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभा घ्यावी’ जिल्हा परिषदेची तहकुब सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घेतल्यास सर्व सदस्यांना सहभागी होता येणार नाही. बहुतांशी सदस्य कामकाजापासून वंचित राहतील. विषय मांडून घाईघाईत मंजूरी घेतली जाईल. एकाच वेळी अनेक सदस्य बोलत राहिल्यास गोंधळ होईल. त्यामुळे ही सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेऊ नये, ज्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तेथे सामाजिक अंतराची मर्यादा पाळून सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभा घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT