संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) शिवनेरी किल्ल्यावर येत आहेत. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे कोणत्या घोषणा करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. श्री. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा मुंबई बाहेरील हा पहिलाच जाहीर दौरा आहे. यानिमित्ताने ते शिवनेरीवरून शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

श्री. ठाकरे हे गड किल्ले संवर्धनासाठी आग्रही आहेत. राज्य शासनाच्या वतीने २००२ पासून शिवनेरी संवर्धन आणि विकास सुरू आहे. यामुळे हा किल्ला किल्ले संवर्धनाचे माॅडेल ठरणार असल्याने राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य गड किल्ले संवर्धन आणि विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेसह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे २००७ पासून करीत आहेत. या मागणीचे निवेदन आढळराव यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिवनेरीवरील अंबरखाना इमारतीत सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालयाची देखील मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही मागण्या मंजूर होण्याची घोषणादेखील मुख्यमंत्री ठाकरे करण्याची शक्यता आहे.

रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टरचा प्रकल्प अहवाल सादर करा शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारण्याची मागणी माजी खासदार आढळराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. हीच मागणी आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घेऊन केली आहे. या वेळी क्लस्टर आणि शिवनेरीवरील संग्रहालयाबाबत ठाकरे यांनी विशेष रस दाखवत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. 

आज (ता. १२) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बळिराजा कृतज्ञता दिवस साजरा करत आहे. याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहेत. या वेळी ते कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांच्यासह शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT