मुख्य बातम्या

Fish Production in India : भारताची मत्स्यव्यवसायात बाजी; १२९ देशांना भारताकडून मस्त्य खाद्य पुरवठा

Team Agrowon

India Fish Production : भारताला सागरी क्षेत्र मोठे असल्याने देशभरात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन घेतले जाते. दरम्यान भारताचा जगभरात मत्स्य उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. जगाच्या दृष्टीकोनातून भारताचा मत्स्योत्पादानात जवळपास ८ टक्के वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Parshottam Rupala) यांनी दिली.

रुपाला यांनी मागच्या ९ वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला, यावेळी देशभरात मत्स्यव्यवसात २.८ कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना प्राथमिक स्तरावर उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान केल्याची माहिती रुपाला यांनी दिली.

मागच्या काही वर्षांत भारत सरकारकडून मत्स्यपालनात आणि मस्त्यसंर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विवीध उपाययोजना राबवल्या आहेत. यामध्ये मत्स्यपालक आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवर्तनकारक उपक्रम हाती घेतल्याचे रुपाला यांनी सांगितले.

२०१५ पासून केंद्र सरकारने ३८ हजार ५७२ कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीला मान्यता दिली. यातून मागच्या ९ वर्षांमध्ये विक्रमी मत्स्य उत्पादन झाले आहे. भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन ९५.७९ लाख टन (२०१३-१४ अखेर) वरुन १६२.४८ लाख टन २०२१-२२ पर्यंत वाढले आहे.

म्हणजेच सुमारे ६६.६९ लाख टनांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय मत्स्य उत्पादन २०१३-१४ च्या तुलनेत ८१ टक्के वाढ नोंदवत १७४ लाख टनापर्यंत पोहोचणे किंवा त्याहून अधिक होणे अपेक्षित असल्याची माहिती रुपाला यांनी दिली.

रुपाला यांच्या माहितीनुसार, २०१३-१४ पासून भारतातील समुद्री खाद्य निर्यातीत डबल फायदा झाला आहे. तसेच मागच्या ९ वर्षात समुद्री खाद्याची निर्यात ३० हजार २१३ कोटी रुपये होती. त्यामध्ये वाढ होऊन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १११.७३ म्हणजे ६३ हजार ९६९.१४ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती रुपाला यांनी सांगितली.

सध्या १२९ देशांमध्ये भारतीय समुद्री खाद्य निर्यातीमध्ये भारताचा सर्वात मोठा आयातदार अमेरिका आहे. याचबरोबर मच्छीमार आणि मत्स्यशेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे मच्छिमार आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करत असल्याचे रुपाला म्हणाले.

आत्तापर्यंत मच्छिमार आणि मत्स्यपालकांना १ लाख ४२ हजार ४५८ किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT