GDP Growth 
मुख्य बातम्या

तिसऱ्या तिमाहीत GDP ची गाडी ५.४ टक्क्यांवर अडकली

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ५.४ टक्के राहिला आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता.२८) देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची म्हणजेच जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नॅशनल स्टॅटीस्टिकल ऑफिसने (एनएसओ) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

टीम ॲग्रोवन

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ५.४ टक्के राहिला आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता.२८) देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाची (Gross Domestic Product) म्हणजेच जीडीपीची (GDP) आकडेवारी जाहीर करण्यात आली. नॅशनल स्टॅटीस्टिकल ऑफिसने (National Statistical Office) (एनएसओ) ही आकडेवारी जाहीर केली आहे. एनएसओच्या  (NSO)आकडेवारीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम तिसऱ्या तिमाहीच्या विकास दरावर दिसून आला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर ८.४ टक्के इतका वाढला होता. मात्र तिसऱ्या लाटेने विकासाला खीळ बसली आहे.  

चालू आर्थिक वर्षाच्या (Current Financial Year) तिसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (Economic Growth Rate) ५.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मात्र तिसऱ्या तिमाहीचा विकास दर हा ५.४ टक्क्यांवर राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत जीडीपी हा ०.७ टक्के इतका होता. एनएसओच्या दुसऱ्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी दर हा ८.९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जानेवारीत जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात विकास ९.२ टक्के इतका राहण्याचा अंदाज होता. तर २०२०-२१ मध्ये हाच अंदाज ६.६ टक्के इतका होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होता. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी दर ८.५ टक्के होता.

भारताची वित्तीय तुट ही एप्रिल २०२१ पासून जानेवारी २०२२ या काळात वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२२ साठीचे ध्येय हे ५८.९ टक्के इतके झाले आहे. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने २८ फेब्रुवारीला जारी केलेल्या आकडेवारीत हे दिसून आले आहे. एप्रिल-डिसेंबर २०२१ मध्ये वित्तीय तुटीचे पूर्ण वर्षाचे ध्येय हे ५०.४ टक्के इतके होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT