Pork Import 
मुख्य बातम्या

अमेरिकन डुकरांचे मांस आणि उत्पादन आयातीला भारताची सहमती

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे झालेल्या भारत-अमेरिका ट्रेड पॉलिसी फोरममध्ये मध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये कृषी उत्पादनांच्या व्यापार विस्तारावर सहमती झाली होती.

वृत्तसेवा

वृत्तसंस्था - भारताने अमेरिकन डुकरांचे मांस (Pork) आणि त्यापासून तयार झालेल्या उत्पादनांच्या आयातीला सहमती दर्शवली आहे. यामुळे अमेरिकन कृषी व्यापारातील दीर्घकालीन अडथळा दूर झाला आहे, असे अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कॅथरीन टाय आणि कृषी सचिव टॉम विल्सॅक यांनी सोमवारी (ता.१०) सांगितले. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकन डुकरांचे मांस पहिल्यांदाच आयात करण्यास परवानगी देणारा भारताचा करार ही अमेरिकन उत्पादक (American Producer) आणि भारतीय ग्राहकांसाठी (Indian Custmer) चांगली बातमी आहे, असे टाय यांनी एका निवेदनात म्हटले आहे. अमेरिकन पोर्क उद्योग (Pork Industry) शक्य तितक्या लवकर भारतात उत्पादनांची निर्यात करू शकेल, असा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे विल्सॅक यांनी म्हटले आहे. 

जागतिक बाजारातील अमेरीकेे स्थान -   डुकरांचे मांस आणि उत्पादनांच्या ७.७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची विक्री अमेरिकेने केली होती. २०२० मध्ये डुकरांचे मासं उत्पादनात अमेरीका हा जगातील तिसरा आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश होता. २०२१ आर्थिक वर्षात अमेरिकेने भारताला १.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कृषी उत्पादनांची निर्यात केली होती.  

व्हिडीओ पाहा -  

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे झालेल्या भारत-अमेरिका ट्रेड पॉलिसी फोरममध्ये मध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये कृषी उत्पादनांच्या व्यापार विस्तारावर सहमती झाली होती. ज्यामध्ये अमेरिकेच्या चेरी, अल्फाल्फा, वाळवलेले धान्यासह भारतीय आंबा, द्राक्ष, कोळंबी आणि म्हशीचे मांस याचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत लोकशाहीमधील संबंध मजबूत करण्यासाठी व्यापार संबंध वाढीस सहमती दर्शविली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT