Tree Planting
Tree Planting 
मुख्य बातम्या

शेतजमिनींवर वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी ''बांध तिथे झाड योजना"

टीम ॲग्रोवन

वनशेती उपअभियाना अंतर्गत बांध तिथे झाड ही योजना २०१६-१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. शेतीसह शेतीच्या बांधावर झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळावे आणि बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती प्रक्रियेस प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.

महाराष्ट्रासह सध्या देशातील २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मदत दिली जाते. या योजनेंतर्गत रोपवाटिका विकास, बांधावरील वृक्षारोपण, फळ देणारी झाडे, तेलबिया, औषधी वनस्पती याशिवाय फळ देणारी झाडे लावून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.

फलोत्पादन क्षेत्रास चालना देण्यासाठी २०१४-२०१५ पासून केंद्र सरकारकडून  एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबवण्यात येत आहे. फळे, भाजीपाला, मश्रुम, रूट, ट्युबर, मसाले, फुले नारळ, काजू, बांबू आदीच्या लागवडीतून फलोत्पादन क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना राबवण्यात येत आहे.  . याबाबतची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नुकतीच राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT