Ashadhi Ekadashi agrowon
मुख्य बातम्या

Ashadhi Ekadashi : पंढरपूरात आज डझनभर मंत्र्यांची गर्दी, जाणून घ्या किती वाजता होणार शासकीय महापूजा?

Pandharpur Wari : आषाढी एकादशीनिमित्त उद्या (गुरुवार) 29 जून 2023 रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसीय सोलापूर दौरा असणार आहे. त्यांच्यासह पंढरपुरमध्ये डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत.

Team Agrowon

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी पंढरीची वाट चालत आहेत. मंगळवारी अखेरच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरकडे निघालेले पालखी सोहळे पंढरीत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर शासकीय महापूजेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत.

टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जप करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध संतांचा पालखी सोहळा मजल दर मजल करत पंढरपुरात दाखल होऊ लागला आहे. आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकरी दाखल झाल्याने शहराचे वातावरण भक्तिमय झाले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून विमानाने सोलापूरला येणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने दुपारी चार वाजता पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तिथे 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या जनजागृती उपक्रमाच्या समारोप सोहळ्याला उपस्थितीत राहतील.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Internation Trade: भारताची कसोटी पाहणारा काळ

Rabi Crop Insurance: रब्बीतही द्या विमा संरक्षण

E Crop Survey: ई-पीक पाहणीला महिनाभर मुदतवाढ

Paddy Crop Loss: सततच्या पावसाने भात पिकाचे नुकसान

Salokha Scheme: सलोखा योजनेला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT