Team Agrowon
गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हामुळे काहिली काहिली झालेल्या वारकऱ्यांना गेल्या दोन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे काहीसा आल्हाददायक अनुभव येतो आहे.
दरम्यान आलेल्या मॅान्सूनने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पुन्हा सुरु होणार आहेत. ‘विठुरायाने जणू आमचे ऐकले’, हे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर जाणवत आहेत.
सोमवारी (ता.२६) ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण झालं. त्यानंतर दुपारनंतर दुसऱ्या टप्पात येथे सोपानदेव आणि ज्ञानदेव बंधूभेट झाली.
भंडीशेगाव मार्गावर बंधूभेट सोहळा संपन्न झाला. माऊलींची अन् सोपानकाकांची पालखी एकत्र आलेली पाहायला मिळाली.
टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने या रिंगणसोहळ्याचा अनुभवही उपस्थितांनी घेतला.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील खुडुस (ता. माळशिरस) येथील दुसऱ्या गोल रिंगणाने रविवारी (ता.२५) वारकऱ्यांचे डोळे दिपले.