Rural housing scheme Agrowon
मुख्य बातम्या

घरकुल योजनांसाठी मिळणारा निधी कमी

नांदुरा पंचायत समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली चर्चा.

टीम ॲग्रोवन 

नांदुरा, जि. बुलडाणा : पंतप्रधान व रमाई आवास घरकुल योजनांसाठी मिळणारा निधी कमी आहे, असा प्रश्‍न अनेक सरपंचांनी (Sarpanch) उपस्थित केला. येथील पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

आमदार राजेश एकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक पदमराव पाटील, संचालक वसंतराव भोजने, भगवान धांडे, नीलेश पाऊलझगडे आदी उपस्थित होते.

विभागनिहाय आढावा घेऊन त्यावर उपस्थित सरपंचांकडून तक्रारी, प्रश्‍न व सूचना मांडण्याबाबत आमदारांनी सांगितले. पंतप्रधान व रमाई आवास घरकुल (Prime and Ramai Awas Gharkul) योजनांसाठी मिळणारा निधी कमी आहे, असा प्रश्‍न अनेक सरपंचांनी (Sarpanch) केला. एकडे यांनी हा विषय आपण व इतर आमदारांनी विधानसभेमध्ये लावून धरल्याचे सांगितले. त्यामुळे विधानसभेने घरकुल अनुदानामध्ये (household grant) वाढ करण्यासाठी तसा ठराव घेत सरकारने केंद्र सरकारकडे पाठविल्याची माहिती दिली. काही किरकोळ कारणांमुळे प्रपत्र ‘ड’ यादीमधून पात्र घरकुल लाभार्थ्यांची नावे वगळलेली आहेत. ती नावे समाविष्ट करणे व सुटलेली नवीन नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सूचना केल्या.

पदाधिकाऱ्यांची दांडी
पंचायत समितीची वार्षिकसभा व सरपंच मेळावा कोरोनाच्या कठीण काळामध्ये होऊ शकला नव्हता. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रकोप कमी झाला. त्यामुळे एकडे यांनी मेळावा घेतला. यावेळी पंचायत समिती (Panchayat Samiti) किंवा जिल्हा परिषदचे माजी सदस्य, पदाधिकारी गैरहजर राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारीच उपस्थित राहिल्याचे दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT