संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन येत्या आठवड्यात संपणार

यंदा ताकारी उपसा सिंचन योजनेतून तीन आवर्तने देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार दोन आवर्तने झाली असून सध्या तिसरे आवर्तन सुरू आहे. या योजनेतून शेवटच्या गावापर्यंत पाणी दिले आहे. ४ ते ५ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे. तिसरे आवर्तन येत्या आठ ते दहा दिवसांत थांबेल. - प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना.

टीम अॅग्रोवन

सांगली  ः ताकारी उपसा सिंचन योजनेचे तिसरे आवर्तन येत्या आठवड्यात संपेल. चालू वर्षी योजनेची ४ ते ५ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे, अशी माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.

ताकारी उपसा सिंचन योजनेचे तिसऱ्या आवर्तनाचे मुख्य कालव्यातून मिरज तालुक्‍यातील सोनी गावापर्यंत पाणी पोचल्यानंतर पोटकालव्यातून शेतीला पाणी दिले आहे. मुख्य कालव्यातील पाणी बंद केले आहे. सध्या योजनेचा तिसरा आणि चौथा टप्प्पा सुरू करून कडेगाव तालुक्‍यात पाणी सोडले आहे. शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचण्यास विलंब होत असला तरी या आठवड्यापर्यंत आवर्तन सुरू ठेवले जाणार आहे. त्यानंतर हे आवर्तन बंद केले जाईल.

वास्तविक पाहता टप्पा क्रमांक तीन आणि चारमध्ये  पाणी उचलण्यासाठी प्रत्येकी तीन पंप आहेत. त्यापैकी टप्पा क्रमांक तीनमध्ये दोनच पंप तर टप्पा क्रमांक चारमध्ये एक पंप सुरू आहे. त्यामुळे आवर्तन वेळेत पूर्ण होत नाही. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १३ कोटी थकीत आहेत. शासनाकडून ५ कोटी येणे आहे. कारखान्यांकडून ६ कोटी येणे आहे. सध्या योजनेच्या पाणीपट्टीपोटी ४ ते ५ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा प्रश्‍न सुटला आहे. वास्तविक पाहता कारखान्यांकडून ६ कोटींची वसुली अपेक्षित आहे. परंतु कारखानदारांनी पाणीपट्टी पोटी वसूल केलेली रक्कम अजून पाटबंधारे विभागाकडे वर्ग केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम वर्ग करण्यासाठी साखर कारखानदारांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासनाकडून ५ कोटी रुपये येणे दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील योजना सुरू करून दुष्काळग्रस्त भागाला पाणी द्या, असे शासनाने सांगितले होते. त्यासाठी टंचाई निधीतून वीजबिल आणि पाणीपट्टी देण्याचे नियोजन केले होते. या दोन वर्षांतील ताकारी उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी आणि वीजबिलाची ५ कोटी रक्कम झाली होती. ही रक्कम शासनाकडून येणार आहे. ही रक्कम मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाच कोटींची प्रतीक्षा पाटबंधारे विभाग करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT