परभणी जिल्ह्यात खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.२२ पैसे
परभणी जिल्ह्यात खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.२२ पैसे 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.२२ पैसे

टीम अॅग्रोवन

परभणी  ः जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र ८४८ गावांची यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७.२२ पैसे आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी (ता. १५) खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली खरिपाची हंगामी (नजरी) पैसेवारी सरासरी ६१.८४ पैसे होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेली सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५९.३२ पैसे होती. नजरी आणि हंगामी पैसेवारी ५० पैसे जास्त आली होती. फक्त परभणी तालुक्यांतील ५ गावांची सुधारित पैसैवारी ५० पेक्षा कमी आली होती. परंतु, सर्व ८४८ गावांची अंतिम पैसेवारी सरासरी ५० पैश्यांपेक्षा कमी आली आहे. 

परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे असून त्यापैकी बलसा (ता. परभणी) गावाचे कृषिक्षेत्र कृषी विद्यापीठासाठी तर करडखेडा (ता. सेलू), चौधरणी खु., लिंबाळा (ता. जिंतूर) या तीन गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील लागवडीयोग्य ५ लाख ५८ हजार ७२९.९३ हेक्टर क्षेत्रापैकी

यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ३४ हजार ३४७ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली. परंतु, २४ हजार ३८२ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले होते. यंदा जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४८ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ४७.२२ पैसे आली आहे असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) अंतिम पैसेवारी 
तालुका गावे पेरणी क्षेत्र  पैसेवारी
परभणी १३१ ९९,१३८ ४३.५०
जिंतूर  १६९  ८३,९६६  ४८.७५
सेलू ९४  ६५,२७८  ४८.००
मानवत ५४ ४५,१६६ ४५.६९
पाथरी   ५८  ४७,०३७ ४८.०३
सोनपेठ ६०   ३२,३०७  ४७.६६
गंगाखेड   १०५ ५८,६७४ ४८.७४
पालम   ८२  ४५,६५० ४७.६६
पूर्णा  ९५  ५७,१०१ ४६.९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT