गाळोशी येथील कोरडवाहू शेतजमिनीत पाणी मुरवण्यासाठी दगडी बांध बांधताना बेंडकोळी कुटुंब. 
मुख्य बातम्या

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी राबले बेंडकोळी कुटुंब

नाशिक : वर्षानुवर्षे बेभरवशाचे पर्जन्यमान अन् होणाऱ्या थोड्या फार पावसावर अवलंबून कोरडवाहू शेती असल्याने शेतजमिनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. याच अनुषंगाने डोंगर माथ्यावरील नैसर्गिक नाल्यातून शेतात वाहून येणारे पाणी शेतातच मुरावे, यासाठी नाशिक तालुक्यातील गाळोशी येथील बेंडकोळी कुटुंब भर उन्हात राबले अन् त्यांनी दगडी बांध बांधून पाण्याची समस्या कायमची सोडविली आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : वर्षानुवर्षे बेभरवशाचे पर्जन्यमान अन् होणाऱ्या थोड्या फार पावसावर अवलंबून कोरडवाहू शेती असल्याने शेतजमिनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी अनेक शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. याच अनुषंगाने डोंगर माथ्यावरील नैसर्गिक नाल्यातून शेतात वाहून येणारे पाणी शेतातच मुरावे, यासाठी नाशिक तालुक्यातील गाळोशी येथील बेंडकोळी कुटुंब भर उन्हात राबले अन् त्यांनी दगडी बांध बांधून पाण्याची समस्या कायमची सोडविली आहे.

नाशिक तालुक्यातील गाळोशी गावातील इंदिरानगर पाड्याच्या उत्तरेस असलेल्या डोंगरमाथ्याला लागून बेंडकोळी कुटुंबीयांची शेती आहे. ऐन पावसाळ्यात डोंगराचे पाणी वाहून थेट शेतात येते. त्यामुळे शेतातील भाताचे उभे पीक वाहून जायचे, शेताचा बांध फुटून जमिनीचा सुपीक पोयटा वाहून जायचा. दर पावसाळ्यात ही समस्या निर्माण व्हायची. यावर कायमचा पर्याय शोधण्यासाठी बेंडकोळी कुटुंबातील ५ सदस्यांनी या नाल्यात दोन आठवडे राबून ३ फूट रुंद असे १८ ते २० फूट लांबीचे हे दोन दगडी बांध रचले.

त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणारी ही समस्या कायमची सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कुटुंबात ५ सदस्य असून, अनिल बेंडकोळी हा युवा शेतकरी आहे. त्यांनी १२ वीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षण सुरू केले. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, घरची कोरडवाहू शेती व अन्य वेळी मजुरी करून घरचा खर्च भागतो. दरवर्षी डोंगरातील येणाऱ्या पाण्यामुळे भाताचे पीक वाहून जायचे. पुढे पाऊस गेल्यावर आवण कोरडेठाक व्हायचे. त्यामुळे भात पीक पिवळे पडायचे; म्हणून कोरडवाहू शेतात डोंगरावरून येणारे पाणी मुरवण्यासाठी आणि अडवण्यासाठी हे दगडी बांध बांधले. यासाठी मोठ्या जिद्दीने हे संपूर्ण कुटुंब राबले, हे विशेष. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT