खासदार छत्रपती संभाजीराजे 
मुख्य बातम्या

‘सारथी’ची स्वायत्तता कायम राखण्याचे आश्वासन; संभाजीराजे यांचे उपोषण मागे

टीम अॅग्रोवन

पुणे  : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ या संस्थेची स्वायत्तता कायम राहण्यासाठी कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरू केलेले लाक्षणिक उपोषण शनिवारी (ता.११) यशस्वीरीत्या मागे घेतले.

‘सारथी’चे विद्यमान प्रमुख जे. पी. गुप्ता यांना हटवून त्यांच्या जागी ए. टी. परिहार यांची नियुक्ती करण्याचे; तसेच ‘सारथी’ची स्वायत्तता कायम राखण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आपण येथे आल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील, असे शिंदे यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांपैकी वरील तीन प्रमुख मागण्यांबाबत मंत्री शिंदे यांनी जागेवरच निर्णय घेतल्याने खासदार संभाजीराजे यांनी उपोषण थांबविण्याचा निर्णय जाहीर केला. ‘सारथी’च्या संदर्भाने लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय खासदार संभाजीराचे यांनी जाहीर केल्यानंतर या विषयावर राज्यभर चर्चा झाली होती. खासदार संभाजीराजे यांनी उपोषण करू नये, ‘सारथी’च्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून, योग्य ते सर्व निर्णय होतील, असे सरकारने जाहीर केले होते. 

तरीही खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सरकारच्यावतीने मंत्री शिंदे यांनी उपोषणस्थळी येत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. यापुढे ही संस्था अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT