weather prediction
weather prediction 
मुख्य बातम्या

पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच असले तरी गारठा कायम आहे. शुक्रवारी (ता. ३१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आज (ता. १) हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून, गारठाही कायम राहण्याची शक्यता आहे. 

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव, ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली होती. मात्र गुरुवारी (ता. ३०) अचानकपणे गारठा वाढून निफाड येथे तापमान सहा अंशांपर्यंत घसरले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमानाचा पारा खाली आल्याने गारठा वाढला. शुक्रवारी (ता. ३१) विदर्भात तापमान कमी झाल्याचे दिसून आले. पुणे, धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, निफाड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया येथे तापमान ११ अंशांच्या जवळपास किंवा त्यापेक्षाही खाली आले. 

शुक्रवारी (ता. ३१) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ११.३ (०), धुळे ६.६, जळगाव ११.२ (-३), कोल्हापूर १६.५ (१), महाबळेश्‍वर १३.६ (०), मालेगाव ११.२ (०), नाशिक १०.८ (०), निफाड ७.५, सांगली १५.१ (०), सातारा १३.२ (-१), सोलापूर १५.९ (-१), अलिबाग १६.३ (-१), डहाणू १४.८ (-३), सांताक्रूझ १५.० (-३), रत्नागिरी १६.७ (-२), औरंगाबाद ११.९ (-१), परभणी ११.१ (-४), नांदेड १४.० (०), उस्मानाबाद १०.६ (-५), अकोला ११.२ (-४), अमरावती ११.० (-४), बुलडाणा ११.६ (-४), चंद्रपूर १२.६ (-३), गोंदिया १०.५(-४), नागपूर १२.२(-२), वर्धा १२.० (-२), यवतमाळ १३.०(-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT