Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

Rural Development : गरिबीमुक्त गावासाठी सुमारे ३९ सूचकांक निर्धारित केले आहेत. गाव गरिबीमुक्त आणि शाश्‍वत उपजीविकेचे होण्यासाठी प्रत्येक बाबींचे विलगीकरण करून त्याच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्यपणे काम होते आहे किंवा कसे हे या ३९ निर्देशांकातून पाहण्यात येते.
Panchayat Development
Panchayat DevelopmentAgrowon

डाॅ. सुमंत पांडे

Village Development : गरिबीमुक्त गावासाठी सुमारे ३९ सूचकांक निर्धारित केले आहेत. गाव गरिबीमुक्त आणि शाश्‍वत उपजीविकेचे होण्यासाठी प्रत्येक बाबींचे विलगीकरण करून त्याच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्यपणे काम होते आहे किंवा कसे हे या ३९ निर्देशांकातून पाहण्यात येते.

ग्रामपंचायतीने आपल्या आराखड्यामध्ये यासाठी निर्धारित केलेली रकमेपैकी किती रक्कम खर्च झाली? किती रक्कम अखर्चित आहे?

बालक, गरोदर, स्तनदा मातांची, वृद्धांची, सर्वांची नियमितपणे आरोग्य तपासणी होते आहे किंवा कसे?

किती कुटुंबांना प्रधानमंत्री जन आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळतो?

घर नसलेले / बेघर किती कुटुंबे आहेत?

किती महिलांचे जनधनमध्ये खाते उघडण्यात आलेले आहे? त्यांना नियमितपणे पतपुरवठा होतो किंवा कसे?

गावांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी तयार केली आहे का? ती कार्यरत आहे का?

गावामध्ये बेरोजगार स्त्री-पुरुष संख्या.  स्वयंसाह्यता गटांना बँकेकडून वेळोवेळी पतपुरवठा करण्यात येतो का?

कृषी उत्पादनांची उत्पादकता उदा. गहू, ज्वारी, भात या पिकांचे प्रतिहेक्टर उत्पादन? किती क्षेत्रावर पेरणी असते?

मग्रारोहयो अंतर्गत किती लोकांनी रोजगाराची मागणी केलेली आहे आणि त्यांना रोजगार मिळाला का?

गावामध्ये एटीएमची अथवा इतर पद्धतीने बँकांचे पैसे मिळण्याची व्यवस्था आहे का? 

Panchayat Development
Village Development : विकास आराखडा महत्त्वाचा

संकेतस्थळावर नोंदणी

प्रत्येक कृती योग्य बाबींसाठी निर्देशांक तयार करण्यामध्ये पंचायत राज मंत्रालय आणि निती आयोगाने एकत्रितपणे काम करून हे पंचायत विकास निर्देशांक तयार केलेले आहेत. नियमितपणे या निर्देशांकामध्ये माहिती भरणे आवश्यक आहे. ही भरलेली माहिती पीडीआय डॉट जीओव्ही डॉट इन (pdi.gov.in) या संकेतस्थळावर भरावी लागते. यासाठी संबंधित विभागाच्या नोडल ऑफिसरला प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 

माहिती कोणी भरावी आणि कशी भरावी?

पंचायत विकास निर्देशांकामध्ये माहिती अत्यंत अचूकपणे

आणि गुणवत्ता पूर्ण माहिती भरण्याबाबत सर्व विभागांत सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ही माहिती जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना नियमितपणे संकेतस्थळावर भरावी लागते. भरलेली माहिती मग धोरणात्मक निर्णय घेणारे विभाग, अधिकारी, यांच्याकडे उपलब्ध होते. ते नियमितपणे या माहितीचे संश्‍लेषण करून कामाच्या अंमलबजावणीनुसार

पंचायतीची वर्गवारी करण्यात येते.

पंचायत विकास निर्देशांकाची वैशिष्ट्ये 

पंचायत विकास निर्देशांक हे ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने काम करावयाचे याचे दिशा दर्शन करते. शाश्‍वत विकासाच्या ध्येयाच्या अंमलबजावणीमध्ये ही बेसलाइन माहिती म्हणून उपयोगात आणता येते. या माहितीचा उपयोग जिल्हा राज्य आणि केंद्र पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. पंचायत विकास निर्देशांकातील गुणांकानुसार पंचायतीच्या कामगिरीची पाच विभागांत वर्गवारी करण्याचे करण्यात येते. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी पंचायत विकास निर्देशांकाच्या सूचीचा वापर करण्यात येतो.  

 शून्य ते ४० गुण प्रारंभिक

 ४१ ते ६० आकांक्षित

 ६१ ७५ प्रदर्शनकर्ता 

 ७६ ते ९० अग्रणी

 ९० च्या वर प्राप्तकर्ता

Panchayat Development
Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

माहितीची गुणवत्ता आणि देखरेख

भरलेली माहिती अचूक आणि वस्तुस्थितीचे प्रक्षेपण करणारी असावी यासाठी विविध स्तरावर समित्या निर्माण करण्यात आल्या आहेत.

राज्य स्तर : सुकाणू समिती अध्यक्ष मुख्य सचिव आणि संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था हे सदस्य सचिव.

राज्य स्तर, संनियंत्रण आणि माहिती प्रमाणीकरण : अध्यक्ष सचिव ग्रामविकास विभाग आणि संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था हे सदस्य सचिव.

जिल्हा स्तर : संनियंत्रण आणि माहिती प्रमाणीकरण समिती अशा दोन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

उपविभाग स्तर व तालुकास्तर

उपविभाग स्तर संनियंत्रण समिती आणि तालुकास्तर माहिती प्रमाणीकरण समिती.

ग्रामपंचायत स्तर माहिती संकलन समिती :

विविध विभागांशी समन्वय ठेवून माहिती संकलित करणे.

आपल्या विभागाची माहिती विहित नमुन्यात, योग्य, अचूक, गुणवत्तापूर्वक आणि जलदगतीने भरून फासिलिटेटरच्या ताब्यात देणे.

या समितीचे अध्यक्ष, प्रशासक असतात. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे सदस्य सचिव असतात.

माहितीच्या गुणवत्तेच्यासाठी वेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्या ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत निर्धारित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी असतात. त्याचप्रमाणे सांख्यिकी विभागाचे अधिकारी ही जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव आहेत.

आपल्या गावाचे पंचायत विकास निर्देशांक ग्रामस्थांना देखील पंचायतीमध्ये हे कामकाज पाहता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com