व्हिएसआयमधील ऊस पिकाचा प्लाॅट
व्हिएसआयमधील ऊस पिकाचा प्लाॅट 
मुख्य बातम्या

`व्हिएसआय`च्या ऊस प्रक्षेत्रांना दोन लाख शेतकरी भेट देणार

टीम अॅग्रोवन

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मांजरी येथील मुख्यालयाच्या आवारात नामवंत शास्त्रज्ञांनी कष्टपूर्वक तयार केलेल्या ऊस प्रक्षेत्रांना पाहण्यासाठी दोन लाख शेतकरी यंदा भेट देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय साखर परिषदेची जय्यत तयारी व्हीएसआयमध्ये सध्या सुरू आहे. 

परिषदेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख व कृषी संचालक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी यंदा देशभरातील सर्व प्रमुख ऊस जातीची प्रक्षेत्रे तयार केली आहेत. आठ एकर क्षेत्रात पसरलेले या भव्य प्रक्षेत्रांची माहिती घेताना राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी जादा उत्पादकता व कमी पाण्याच्या वाणांकडे वळावा असा हेतू ठेवण्यात आला आहे. ३१ जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद होत आहे. 

दक्षिण भारतातील ३८ आणि उत्तर भारतातील १८ प्रकारच्या ऊस वाणांची प्रक्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या आवडीच्या को-८६०३२, कोएम०२६५, व्हीएसआय ८००५ आणि एमएस १०००१ वाणांचे प्लॉट बघता येतील. विशेष म्हणजे उत्तर भारतात झपाट्याने शेतकरीप्रिय झालेल्या को०२३८ वाणाची लागवड देखील व्हीएसआयने केली आहे. मात्र, को०२३८ वाण राज्याच्या वातावरणासाठी अनुकूल नसल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

व्हीएसआयच्या बेणे मळ्यातून एक हजार टिपरी अंदाजे ८५० रुपयांना मिळू शकते. एक एकर क्षेत्रात दहा हजार टिपरी लागवड करता येते. मात्र, त्यापासून शेतकरी १२ ते १५ एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके प्रमाणित बेणे तयार करून विकू शकतो. व्हीएसआयच्या उतीसंवर्धन विभागाकडून देखील ऊस गुणवत्ता वाढीला चालना देणाऱ्या रोपांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. उसाचे चांगले बेणे तयार करण्यासाठी उतिसंवर्धित रोप सात रुपयाला पुरवले जाते. एकरी साडेचार हजार रोपे लागतात.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने ऊस लागवडीच्या विविध पद्धती शेतकऱ्यांना दाखविल्या जाणार आहेत. रुंद सरी पध्दत, जोड ओळी पट्टा पध्दत, एक डोळा टिपरी लागवड, दोन डोळा टिपरी लागवड, एक डोळा रोप लागवड अशा पाच पद्धती शास्त्रज्ञांनी तयार केल्या  आहेत.  

“राज्याच्या प्रत्येक गावातून जाणकार शेतकऱ्यांनी परिषदेला हजेरी लावण्याचा तसेच प्रक्षेत्रे बघून नवे तंत्र व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या निमित्ताने ऊस लागवडीपासून ते प्रक्रिया उत्पादनापर्यंत सर्व माहिती बारकाईने देण्याचा प्रयत्न आमचा प्रयत्न आहे.” असे व्हीएसआयचे कृषी संचालक विकास देशमुख यांनी सांगितले.   शेतकऱ्यांना बेणे पुरविणार विविध वाणांचे सर्व प्लॉट्स सध्या सात महिन्यांच्या अवस्थेत आहेत. याशिवाय ऊस बेणे मळा तयार करण्यात आला आहे. त्यात प्रजनीत, पायाभूत आणि प्रमाणित अशा त्रिस्तरीय पद्धती दाखविण्यात आल्या आहेत. पारंपरिक बेण्यातून शेतकऱ्यांना उत्पादनात किमान २५ टक्के घट सोसावी लागते. तर, व्हीएसआयच्या चांगल्या बेण्यामुळे १० ते १५ टक्के उत्पादन वाढते. त्यामुळे आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना पायाभूत बेणे मोठ्या प्रमाणात पुरविणार आहोत, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT