संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तूर विक्री नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : किमान आधारभूत किमतीने तूर खरेदीकरिता आॅनलाइन नोंदणीसाठी राज्य शासनाने ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता १५ मार्चपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

राज्यभरात शासनाने राज्य सहकारी पणन महासंघ, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ नागपूर व ‘महाएफपीसी’च्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शासन निर्णयानुसार १ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी व त्यानंतर खरेदी असे नियोजन होते. परंतु बुधवारी (ता. १२) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या पत्रकानुसार हमीभावाने तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणीला ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच्या नियोजनानुसार सुरू असलेली नोंदणी आता १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

१ जानेवारीपासून सुरू झालेल्या नोंदणीप्रक्रियेत ९ फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यातील २९८ खरेदी केंद्रांवर १ लाख ९७ हजार ७७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शिवाय १ फेब्रुवारीपासून खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. या खरेदीसाठी ऑनलाइन सात -बारा आणि आॅनलाइन पीकपेरा आवश्‍यक आहे. मात्र शेतकऱ्यांना आॅनलाइन पीकपेरा मिळत नसल्याने हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणीत अडथळा निर्माण झाला होता. त्याचबरोबर तुरीत अपेक्षित आर्द्रतेचाही अभाव होता. काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने आर्द्रतेचा प्रश्‍नही अधिकच बिकट झाला होता. मात्र नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने हा अडथळा दूर होणे शक्‍य आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT