PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

PM Modi In Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मंगळवारी सभांचा झंजावात असणार असून माळशिरसमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेससह शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.   
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रात झंझावात पाहायला मिळत आहे. राज्यात मंगळवारी (ता. ३०) त्यांच्या ३ सभातून होणार असून सोलापुरच्या माढ्यातील जाहीर सभेत मोदींनी काँग्रेससह माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींनी पवार यांचे नाव न घेता टीका करताना, १० वर्षात यांना उसाच्या एफआरपीत वाढ करता आली नाही. तर काँग्रेसने मागील ६० वर्षात जेवढे दिले नाही तेवढे मोदी सरकारने दिले असे म्हटले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. 

बूडत्या सुर्याची शपथ

पुढे मोदी म्हणाले, 'येथे १५ वर्षांपूर्वी एका नेत्याने येऊन दुष्काळपट्ट्यात पाणी देऊ अशी घोषणा बूडत्या सुर्याची शपथ घेऊन केली होती. मात्र त्याला ते करता आलेले नाही. त्याला दिलेले वचन पूर्ण करता आलेलं नाही. या नेत्याला इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही', अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता केली.

नेत्याचा हिशोब

'राज्यातील जनता आशिर्वाद देताना कोणतीच कसरत सोडत नाही. पण जे आश्वासन पाळत नाहीत त्यांचा हिशोब देखील करते. या नेत्याचा हिशोब देखील जनता येता निवडणुकीत करेल', असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. 

उसाला एफआरपी २०० रुपयांच्या आसपास

राज्यातील साखर उद्योगावरून पवार यांच्यावर टीका करताना, '१० वर्षांपूर्वी देशाचे रिमोट कंट्रोल यांच्या सरकारकडे होते. तेंव्हा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कृषिमंत्री होते. इथल्या बलाढ्य नेत्यांनी दिल्लीवर राज्य केले. तेव्हा उसाला एफआरपी २०० रुपयांच्या आसपास होती. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तेंव्हा साखर उद्योगावरून त्यांना अनेकदा पत्र लिहली, त्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी यावर कानाडोळा केला. त्यांनी देशातील शेतकऱ्यांची निराशा केली. पण आता मोदींच्या कार्यकाळात उसाची एफआरपी सुमारे ३५० रुपये झाल्याचे,' मोदी म्हणाले. 

फक्त गरिबी हेच शब्द

'आमच्या सरकारने १० वर्षात केलेली कामे आणि विकास जनतेला दिसून आहे. हा फरक त्यांना दिसत आहे. जनतेनं काँग्रेसच्या तोंडून फक्त गरिबी हेच शब्द ऐकले. पण काँग्रेसला गरिबी काही हटवता आली नाही. पण तुमच्या आशीर्वादाने आम्ही मागील १० वर्षात २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले. हे माझे काम नसून फक्त जनतेचे पुण्य आहे', असे मोदी म्हणाले.

महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात

'देशाने काँग्रेसला ६० वर्षां संधी दिली. या कालावधीत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलली. पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. २०१४ मध्ये सुमारे १०० सिंचन प्रकल्प होते जे अनेक दशकांपासून प्रलंबित होते. यापैकी २६ प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला आहे याची कल्पना करा. येथील एकाही प्रकल्पाचे काम पुर्ण केले नाही. पण देशात आमची सत्ता आली आणि ते आता मार्गी लागले आहेत. येथे युतीचे सरकार चांगले काम करत आहे', असे मोदी म्हणाले.

ही मोदीची गॅरंटी

'विकसित भारत घडवण्यात देशातील महिला शक्तीचा मोठा वाटा असून नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे एक कोटी बहिणी या लखपती दीदी झाल्या आहेत. आता ३ कोटी बहिणींना लखपती दीदी करण्याचा आमचा मानस असून ही मोदीची गॅरंटी आहे', असेही मोदी म्हणाले. 

कृष्णेचे पाणी उजणीत आणणार

यावेळी उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी देखील भाषण करताना, विरोधाकांवर जोरदार टीका केली. फडवणीस यांनी, माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकरच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रत्येक निवडणूकीत विरोधकांकडून तिच तिच आश्वासने आणि त्याच त्याच घोषणा देण्यात आल्या आहेत. पण मतदारसंघातील प्रश्न काही सोडवता आलेले नाहीत. तर हे प्रश्न नाईक निंबाळकर निवडून गेल्याने सुटले. आता पाण्याचा प्रश्न देखील आम्ही सोडवणार आहोत. वर्ल्ड बँकेतून निधी मिळाला असून कृष्णेतून वाहून जाणारे पाणी ३६ गावांना मिळणार आहे. कृष्णेचे पाणी उजणीत आणणार आहोत. तर सोलापूरात शिंदे, पवार आणि मोहीते पाटील फक्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत. तुमच्या पुढच्या पुढीसाठी नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

येथे होणार मोदींच्या सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सहा सभा होतील. यापैकी सोमवारी सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे भोसले आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि आढळराव पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्या आहेत. तर मंगळवारी माळशिरसमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी सभा पार पडली आहे. आता लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com