तरवा जाळण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून गोळा केलेले कवळे.
तरवा जाळण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून गोळा केलेले कवळे.  
मुख्य बातम्या

पाटण तालुक्यात भात लागवडपूर्व कामांची तयारी सुरू

टीम अॅग्रोवन

पाटण, जि. सातारा  ः खरीप हंगामातील भात लागवडपूर्व कामांच्या तयारीस तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने भात व नाचणीचे तरवे जाळण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडून कवळे करण्याचे काम सुरू आहे. होळीनंतर तरवे जाळण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे चित्र आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात भात व नाचणी लागवडीचे तरवे टाकून पुन्हा पुनर्लागवड करण्यात येते. त्यासाठी ज्या शेतात तरवा पेरण्यात येतो, तेथे आसपासच्या परिसरातील झाडांच्या फांद्या पानगळ होण्याअगोदर तोडल्या जातात. तोडलेल्या फांद्या एकत्र करून त्याची ओझी बांधली जातात. गोळा केलेली कवळ्यांची ओझी ज्या शेतात तरवे पेरण्यात येतो, तेथे शेतकऱ्यांनी जमा केली आहेत. शेणी व कवळे त्या शेतात पसरले जातात. होळीनंतर सायंकाळी ते पेटविले जातात. रात्रभर त्या शेतातील उष्णता कमी झाल्यानंतर सकाळी तरवे जाळलेली राख कुदळीच्या साह्याने मातीत मिसळण्यात येते.

पाऊस सुरू झाल्यावर त्या शेतात भात, नाचणीचे बी पेरले जाते. लागवडीयोग्य पुन्हा तरव्याची उंची झाल्यावर त्याची चिखलणी केलेल्या शेतात भाताची पुनर्लागवड केली जाते.  आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वावर वाढला असला, तरी ही पद्धत व परंपरा आजही पाहावयास मिळते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT