संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापुरात ज्वारीला दमट वातावरणाचा फटका

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः पावसाच्या भरवशावर यंदा रब्बीत वेळेवर पेरलेल्या ज्वारीची सध्या काढणी सुरू आहे. पण नंतर झालेल्या पावसावर काहीशा उशिरा पेरल्या गेलेल्या ज्वारीला सध्याच्या दमट वातावरणाचा फटका बसत आहे. या ज्वारीवर चिकटा आणि करपासारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर जिल्हा हा रब्बी हंगामाचा म्हणून ओळखला जातो. त्यातही रब्बी ज्वारीचे प्रमाण सर्वाधिक असते. जिल्ह्यात या हंगामात दोन टप्प्यांत ज्वारीची पेरणी होते. मुख्यत्वे मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी या भागांत हंगामाच्या अगोदरच किंवा अगदी वेळेवर ज्वारीची पेरणी केली जाते. तर अन्य भागांत काहीशा उशिराने पेरणी होते. त्यातच यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही. पण तरीही पुढे पडेल, या भरवशावर पेरण्या केल्या. पण त्यानंतर पुन्हा अनेक भागांत दमदार पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्र चांगलेच वाढले.

जिल्ह्याचे रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र जवळपास आठ लाख हेक्‍टरपर्यंत आहे. पण त्यात सर्वाधिक ६ लाख हेक्‍टर क्षेत्र ज्वारीचे असते. यंदाही पेरणीच्या आकड्याने बऱ्यापैकी सरासरी ओलांडली आहे. सध्या लवकर पेरलेल्या ज्वारीची काढणी सुरू आहे. पण उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीला आणखी काही दिवस बाकी आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामान प्रतिकूल होत आहे. दमटपणा सर्वाधिक वाढला आहे. या हवामानाचा फटका या ज्वारीला बसत आहे.

ज्वारीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे चिकटा रोग दिसत आहे. तर काही भागांत करपा रोगही दिसत आहे. सुरुवातीला पाऊस न पडल्याने अनेक भागांत ज्वारीची उंची लक्षणीय वाढली, परंतु कणसात काही दाणा भरला नाही, अशी स्थिती आहे. आता तर दमट वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नवीन संकट उभे ठाकले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT