माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासाची स्थिती दर्शवणारा नकाशा 
मुख्य बातम्या

माॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या काही भागांतून माघारी

पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी निघाले आहेत. बुधवारी (ता. ३०) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी निघाले आहेत. बुधवारी (ता. ३०) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपूर्वी परतीच्या प्रवासाला निघालेला मॉन्सून हळूहळू माघारी निघाला आहे. त्यातच वाऱ्यांची दिशाही बदलली असून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने मॉन्सूनने पंजाब, राजस्थान, हिमालयाचा पश्चिम भाग, चंदीगड, दिल्ली, हरियाणा या भागातून माघार घेत लख्मीपूर खेरी, शहजानपूर, अलवार, नागौरपर्यंत दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थानसह मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतणार आहे. या भागात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण कायम आहे.

मॉन्सूनने सोमवारपासून (ता.२८) परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. उत्तर भारतातील अनेक भागात पावसाचा जोर थांबला आहे. पुढे मार्गक्रमण करण्यासाठी पूर्व बिहार, हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम व आसाम या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच दक्षिण गुजरात व परिसरातही चक्रावाताची स्थिती असल्याने मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याची शक्यता आहे.

या भागातील वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. परतीच्या प्रवासामुळे वाऱ्याची दिशा बदलत असल्याची स्थिती आहे. पश्चिम राजस्थानातील चुरू येथे ४०.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. मध्यप्रदेशातील पेड्रा रोड येथे सर्वांत कमी १७.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT