मराठवाड्यातील विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली
मराठवाड्यातील विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन

पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी पडल्या; तर विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. नाशिक, सांगली, पुणे, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसाने पाण्याअभावी कोमेजू लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस पडलेल्या भागात शेतांमध्ये पाणी साचून पिके वाहून गेली. तसेच ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गहाघर येथे सर्वाधिक १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

निफाड, मालेगाव, कळवणमध्ये मुसळधार नाशिक जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यानंतर पिकेही अंकुरली होती. मात्र, महिन्याच्या मध्यंतरीपासून पावसाने खंड दिला. त्यामुळे काही ठिकाणी पिके कोमेजून गेली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असताना निफाड, मालेगाव, सटाणा पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात पावसाने हजरे लावली. 

सांगलीत ओढे, बंधारे तुडुंब सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागातील ओढे, बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे या भागातील लहान बंधारे पाण्याने तुटूंब भरले आहेत.

पुण्यात पावसाची हजेरी पुणे जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या सात ते आठ दिवस पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. शिरूरमधील पाबळ, कोरेगाव भागात मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले होते. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसाचा काही प्रमाणात जोर कमी आहे. इंदापूर, बारामती, दौंड भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून, ओढे पावसाच्या पाण्याने वाहू लागले आहे.

मराठवाड्यात आठ मंडळांत अतिवृष्टी  मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंत औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यांतील आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिके खरडून गेली.  

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग) : कोकण : कुलाबा १०१, अलिबाग ८३, मुरूड ६५, श्रीवर्धन ४१, उरण ६३, चिपळूण ८१, गुहागर १४५, हर्णे ५४, राजापूर ५२, रत्नागिरी १०४, देवगड ४३, दोडामार्ग ८०, कुडाळ ११७, मालवण ७६, रामेश्‍वर ६४, सावंतवाडी ४९, वैभववाडी ४३, वेंगुर्ला ४५. मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६२, शाहूवाडी ४५, तळोदा ४२, कळवण ४०, मालेगाव ६८, नाशिक ४७, सटाना ६६, त्र्यंबकेश्वर ६४, दौंड ७२, राजगुरूनगर ४५, पुणे शहर ५५, पुरंदर ३०, मिरज ३५, विटा ११५, करमाळा ५३. मराठवाडा : औरंगाबाद ३०, अंबाजोगाई ३६, आष्टी ६०, केज ६३, हिंगोली ३८, सेनगाव ३०, आंबड १००, घनसांगवी ४२, जाफ्राबाद ३४, पातूर ४१, औसा ३०, लोहा ४०, भूम ३८, वाशी ६०. विदर्भ : नांदगाव काझी ५५, लाखंदूर ३७, बुलडाणा ३५, चिखली ३३, देऊळगाव राजा ४०, वरोरा ४२, देसाईगंज ३५, मानोरा ४४. १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :  कुलाबा १०१ (मुंबई), गुहागर १४५, रत्नागिरी १०४, कुडाळ ११७ (जि. सिंधुदुर्ग), विटा ११५ (जि. सांगली), आंबड १०० (जि. जालना).

कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज सर्वसाधारण स्थितीत असलेला मॉन्सूनचा आस, पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. आजपासून (ता. १) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही मेघगर्जना, विजांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT