राजापूर  येथील गणेश पाटील यांच्या शेतातील विक्रीला आलेली द्राक्षे.
राजापूर येथील गणेश पाटील यांच्या शेतातील विक्रीला आलेली द्राक्षे. 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू

टीम अॅग्रोवन

तासगाव, जि. सांगली  ः अनेक अस्मानी संकटांवर मात करीत जिल्ह्यात यावर्षीचा द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला ४ किलोच्या पेटीला ५२५ ते ६१५ रुपयांपर्यंत दर व्यापाऱ्यांकडून मिळताना दिसत आहे. परराज्यातील व्यापारी द्राक्षबागांमध्ये दाखल झाले आहेत.

द्राक्ष हंगामाची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून द्राक्ष पिकाला पावसाचे ग्रहण लागले होते. सलग पाच महिने पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील ४० टक्के बागा वाया गेल्या आहेत.  ऑगस्टमध्ये केलेल्या छाटण्या पूर्ण वाया गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या वर्षीचा द्राक्ष हंगाम आणि उत्पादन याबाबत साशंकता असताना नेहमीप्रमाणे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सर्व संकटावर मात करत शेतकऱ्यांनी द्राक्षे बाजारात आणली आहेत. सध्या तासगाव तालुक्‍यातील सावळज, डोंगरसोनी, मिरज तालुक्‍यांतील सोनी, भोसे, करोली परिसरातील द्राक्षे सध्या बाजारात आली आहेत. सप्टेंबरमध्ये फळ छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. मुंबई बाजारपेठेत पहिल्याच टप्प्यात शरद सीडलेसला ६१५ तर सोनाकाला ५२५ रुपये पेटी (४ किलो) असा दर मिळाला आहे. दरवर्षीपेक्षा हा दर कमी आहे. 

सांगली जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष हंगाम सुरू होतो. ख्रिसमसमुळे दर ही चांगले मिळतात. तासगाव तालुक्‍यातील मणेराजुरीची द्राक्षे दरवर्षी पहिल्यांदा बाजारात येतात. मात्र, मणेराजुरीतील द्राक्ष पिकाला यावर्षी पावसाचा फटका बसला तसेच छाटण्या उशिरा झाल्या. सध्या द्राक्ष हंगाम सुरू झाला आहेत. मात्र, द्राक्षांचे प्रमाण अतिशय कमी आहे. बाजारात आलेल्या द्राक्षाला गोडीही कमी आहे. ऑगस्ट छाटणीच्या बागा डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावात सापडल्याने त्याचा परिणाम दर्जावर झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान द्राक्ष हंगाम सुरू झाल्याने मुंबई, कोलकता, बंगळूरु, दिल्ली येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे आगमन जिल्ह्यात झाले आहे. द्राक्ष बागा ठरवण्यासाठी द्राक्षबागांवर मध्यस्थ येऊ लागले आहेत. द्राक्ष उत्पादनात घट होण्याच्या शक्‍यतेने आतापासूनच दर्जेदार द्राक्षांसाठी बुकिंग करताना ते दिसत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT