कापूस, कांदा धोरणाबाबत सरकारचा निषेध करत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आपल्या राहत्या घरी आंदोलन केले. 
मुख्य बातम्या

नगर  : शेतकरी संघटनेने मुठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध

नगर : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आपल्या राहत्या घरी हे आंदोलन केले.

टीम अॅग्रोवन

नगर  : कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापूस जाळून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आपल्या राहत्या घरी हे आंदोलन केले.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी ती अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. तसेच फक्त एफएक्यू कापसाची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखूड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास, भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसासंबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी मुठभर कापूस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी हटवली आहे. तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेडमार्फत २००० रुपये प्रतीक्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापूस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाउनचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. मधुसुदन हरणे, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गीता खांडेभराड, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे आदी नेत्यांनी आपापल्या भागात हे आंदोलन केले, असे श्री. घनवट यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT