Vang Marathwadi Dam agrowon
मुख्य बातम्या

Koyna Dam : कोयनेत उतरून धरणग्रस्तांनी घेतली शपथ; सरकारचा केला निषेध

Dam victims : धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करत सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी, तारळी, वांग मराठवाडी धरणग्रस्तांनी जलाशयात उतरून आंदोलन केले.

Team Agrowon

Project affected aggressively : कोयना, वांग-मराठवाडी, तारळी, उरमोडी धरणग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली धरणात उतरून जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारशी लढा देण्याची शपथ घेतली.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा निषेध करत कोयना, वांग मराठवाडी आणि उरमोडी धरणस्थळी विस्थापित धरणग्रस्तांनी आज, सोमवारी आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत अन्याय कराल तर सत्तेतून खाली खेचू असा इशारा देत धरणग्रस्तांनी पाण्यात उतरून शपथ घेतली.

कोयना, उरमोडी आणि वांग मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बहुतेक गावांचे पुनर्वसन झाले असले तरी प्रकल्पग्रस्तांना अपेक्षित सुविधा अजूनही शासनाकडून पुरविण्यात आल्या नाहीत. गावठाणात आवश्यक भूखंड पाडून सर्व नागरी सुविधायुक्त गावठाण तयार करून भूखंडांचा ताबा द्या, कमी पडणारी जमीन शासनाने उपलब्ध करून घ्यावी आणि तिथे भूखंड पाडून सुविधा निर्माण करा व ताबा द्या, ताईगडेवाडी गावठाणातील अडथळे असलेल्या जमिनीवरील अडथळे ताबडतोब दूर करून जमिनीचा ताबा द्या, ज्यांना जमीन देय आहे; पण जमिनी उपलब्ध नाहीत त्यांना २०१३ च्या पुनर्वसन नियमाला अनुसरून बागायती क्षेत्र जमिनीच्या दराप्रमाणे मोबदला द्यावा, अशा मागण्या आहेत.

त्यातच नव्याने काही अन्यायकारक आणि प्रकल्पग्रस्तांचे आयुष्यच उद्ध्वस्त करणारे निर्णय शासनाने घेतले आहेत. त्याबाबत पुनर्विचार करुन ते निर्णय तात्काळ थांबवावे यासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती. आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पाटण तहसीलदार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे आंदोलकांच्यावर जातीने लक्ष ठेऊन होते.

यावेळी डाॅ. भारत पाटणकर, सचिन कदम, चैतन्य दळवी, बळीराम कदम, श्रीपती माने, किसाबाई थोरवडे,संतोष गोटल, महेश शेलार, सीताराम पवार, विनायक शेलार, पी. डी. लाड, राम कदम, परशुराम शिर्के, शिवाजी कांबळे, दादू थोरवडे, किसन सुतार यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT