Tomato Price Agrowon
मुख्य बातम्या

Tomato Market Price : दर पडल्याने शेतकऱ्याने पेटवला टोमॅटो, किलोचा भाव मिळतोय कॅरेटला

Tomato Rate : गेल्या काही महिन्यांपासून सफरचंदाच्या भावात मिळणाऱ्या टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. आधी किलोला १०० रुपये मिळणार भाव आज कॅरेटला मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Swapnil Shinde

Tomato Prices Decrease : एक महिन्यापूर्वी बाजारात शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या भावामध्ये मोठी पडझड झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना कॅरेटमागे शंभर रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. दरम्यान, शेतकऱ्यांनी टोमॅटोला आग लावून ते पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

एप्रिल महिन्यापासून बाजार टोमॅटोने शंभरी पार केली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या शहरातील बाजारपेठत तर २०० रुपयांवर पोहोचले होते. टोमॅटोचे भाव नियंत्रण करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करत टोमॅटोची खरेदी करायला सुरुवात केली. दरम्यान, नाशिक, लातूर, नारायणगावसारख्या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅट्याची लागवड केली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने बाजारापेठेत भाव पडले.

राज्यातून देशातील सर्वच ठिकाणी त्यात हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका यासारख्या भागात टोमॅटो पाठवले जात असतात. परंतु बाजारात टोमॅटोचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति कॅरेट ८० ते १०० रुपये भाव मिळत आहे. त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT