Krushi Sevak Bharti Agrowon
मुख्य बातम्या

Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभागात ९५२ जागा भरणार, असा करा अर्ज

Maharashtra Krushi Vibhag Bharati 2023 : छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक या विभागांमध्ये भरती होणार आहेत.

Team Agrowon

Krushi Sevak Bharti : महाराष्ट्र सरकारकडून कृषी विभागांतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक या विभागांमध्ये भरती होणार आहेत.

यामध्ये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या (Ex-secondary service selection) कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (on consolidated remuneration) नामनिर्देशनाने/सरळसेवा अंतर्गत स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत.

दरम्यान ही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्याती मुदत आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर - १९६, लातूर - १७०, नाशिक - ३३६, कोल्हापूर - २५० जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.

ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी

Crop Damage : नांदेडमध्ये सप्टेंबरमध्ये ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Gokul Dudh Dar: 'गोकुळ'कडून म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात १ रुपयाने वाढ, पशुखाद्य दरात ५० रुपयांची कपात

Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

Mango-Cashew Crop Damage : बागायतदार आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT